जगात तीनच गोष्टी खऱ्या आहेत- मद्य, मृगया, मीनाक्षी. या तिन्हींच्या सहवासात मनुष्य आपली सर्व दुःखे विसतो. मद्यामुळे माणसाच्या मनाला पंख फुटतात. त्या पंखांच्या फडफडाटाने त्याच्या पायांतल्या शृंखला तुटून पडतात. नीतीच्या, कर्तव्याच्या, पापपुण्याच्या साऱ्या साऱ्या कल्पना मद्याच्या मोहक दाहकतेत वितळून जातात! या जगात ज्याला आपली शिकार होऊ द्यायची नसेल, त्याने सतत इतरांची पारध करीत राहिले पाहिजे. जीवनातले हे अंतिम सत्य शिकवणारा मृगयेसारखा दुसरा गुरू नाही. हे सत्य कठोर वाटते, क्रूर भासते; पण जीवनाच्या महाकाव्यातला हा सर्वांत महत्त्वाचा श्लोक आहे. पवित्र, सुंदर, निष्पाप हे दुबळ्या सज्जनांनी निर्माण
...more