पण कुणाही व्यक्तीने सुखासाठी जी धडपड करायची असते, ती इतर व्यक्तींच्या सुखाला छेद देऊन नव्हे, तर त्यांतल्या प्रत्येकाचे सुख आपल्या सुखाइतकेच महत्त्वाचे आहे, असे मानून! जत्रेतल्या गर्दीत प्रत्येक मनुष्याने दुसऱ्याला आपला धक्का लागणार नाही, ही काळजी जशी घ्यायला हवी, तशीच समाजाच्या सर्व लहानथोर घटकांनीही आपले सुख हे दुसऱ्याचे दुःख होणार नाही, अशी दक्षता घेतली पाहिजे!