कच हा असा विकसित आत्मा आहे. अणुबाँब आणि हैड्रोजन बाँब यांच्याकडे भीतिग्रस्त दृष्टीने पाहणाऱ्या जगाला जो नवा मानव हवा आहे, त्याचा तो पुराणकाळातील प्रतिनिधी आहे. नीतीची प्रगती अंती मानवी मनाच्या विकासावर आणि मानवी आत्म्याच्या विशालतेवर अवलंबून असते; हे या कादंबरीत आपल्या वाणीने आणि कृतीने त्याने अनेकदा सूचित केले आहे. जगात शांती नांदावी, म्हणून बड्या बड्या सत्ताधाऱ्यांनी (या कादंबरीतला शुक्राचार्य हा त्यांचा प्रतिनिधी आहे!) केवळ सदिच्छा व्यक्त केल्याने काही शांती प्रस्थापित होणार नाही; त्यांनी आपले व आपल्या देशांचे विविध मनोविकार आधी नियंत्रित केले पाहिजेत. वैयक्तिक व सामाजिक जीवनात वासनांचे आणि
...more