म्हणूनच संसार यज्ञाइतकाच पवित्र मानला आहे. सर्वसामान्य माणसाचा तोच धर्म आहे. शुक्राचार्य, कच, यति यांच्यासारख्या तपस्व्यांनी जगाच्या कल्याणाची काळजी वाहावी; इंद्र, वृषपर्वा, ययाति यांच्यासारख्या मोठमोठ्या राजांनी आपली प्रजा सुखी कशी राहील, हे पाहावे आणि सर्वसामान्य संसारी माणसांनी आपली बायकामुले, स्नेहीसोबती व संबंधित माणसे यांच्या उन्नतीची चिंता करावी. या सर्वांनी आपले सुख जगातल्या दुसऱ्या कुणाच्याही दुःखाला कारणीभूत होत नाही ना, हे डोळ्यांत तेल घालून पाहिले पाहिजे. व्यक्तिधर्म, संसारधर्म, राजधर्म, यतिधर्म सर्व सारख्याच योग्यतेचे धर्म आहेत. यांपैकी कुठल्याही धर्माला जीवनाचा तिरस्कार करण्याचा
...more