उठल्या-सुटल्या शरीराची पूजा करीत सुटणाऱ्या आणि इंद्रियसुखे हीच जीवनातील सर्वश्रेष्ठ सुखे मानणाऱ्या मनुष्याला— मग तो जुन्या काळातील ययाति असो अथवा नव्या काळातील कुणी अतिरथी-महारथी असो— स्वतःच्या या सुप्त शक्तींची जाणीव असत नाही. पण मानवाची आत्मिक शक्ती— पशुपक्ष्यांहून भिन्न आणि उच्च अशी अनेक सामर्थ्ये सृष्टीने त्याला दिली असल्यामुळे, पिढ्यान् पिढ्या त्या सामर्थ्याची बीजे पेरून नवी नवी पिके काढण्याचे स्वातंत्र्य त्याला लाभले असल्यामुळे आणि या प्रगतीच्या प्रयत्नात धर्म, नीती, कला, शास्त्र, संस्कृती, इत्यादी नव्या सामर्थ्यांचा साक्षात्कार त्याला होत असल्यामुळे, वृद्धिंगत होऊ शकणारी आत्मिक शक्ती—
...more