‘युवराज, संसार करणं हीच मनुष्याची सहजप्रवृत्ती आहे. साहजिकच त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या उपभोगांना स्थान आहे. माणसानं उपभोग घेऊ नयेत, अशी जर ईश्वराची इच्छा असती, तर त्यानं शरीर दिलंच नसतं. पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे. देवानं माणसाला शरीराप्रमाणं आत्माही दिला आहे. शरीराच्या प्रत्येक वासनेला या आत्म्याचं बंधन हवं. म्हणून माणसाचा आत्मा सदैव जागृत असायला हवा! मद्याच्या धुंदीत असणाऱ्या सारथ्याच्या हातून लगाम निसटून जातात. घोडे सैरावैरा उधळतात. रथ खोल दरीत पडून त्याचा चक्काचूर होतो आणि आतला शूर धनुर्धर व्यर्थ प्राणाला मुकतो.’