More on this book
Community
Kindle Notes & Highlights
प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वतःला झालेल्या जखमांनी.
शब्दापेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो. पण त्याला काही माणसाच्या काळजाला हात घालता येत नाही. ते काम अश्रूंनाच साधते. माझ्या गालांवर ऊन आसवे पडताच मी डोळे उघडले. आईला रडताना कधीच पाहिले नव्हते मी. माझे बालमन गडबडून गेले. तिच्या गळ्याला मिठी मारून गालाला गाल घाशीत मी विचारले, ‘आई, काय झालं तुला?’
तिच्या त्या मिठीत माझे अंग दुखू लागले. पण मन मात्र सुखावले.
भय या शब्दानं राजाला भ्यायला हवं!
‘युवराज, जीवन असं आहे. ते सुंदर आहे. मधुर आहे; पण त्याला केव्हा कुठून कीड लागेल, याचा नेम नसतो!’
‘आनंद आहे खरा. पण तो क्षणभुंगर! केवळ उपभोगाचा.’ ‘उपभोगात पाप आहे?’ ‘नाही. धर्माचं उल्लंघन न करणाऱ्या उपभोगात पाप नाही; पण या जगात उपभोगापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा आनंद आहे.’ ‘कोणता?’ ‘त्यागाचा!’
‘युवराज, संसार करणं हीच मनुष्याची सहजप्रवृत्ती आहे. साहजिकच त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या उपभोगांना स्थान आहे. माणसानं उपभोग घेऊ नयेत, अशी जर ईश्वराची इच्छा असती, तर त्यानं शरीर दिलंच नसतं. पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे. देवानं माणसाला शरीराप्रमाणं आत्माही दिला आहे. शरीराच्या प्रत्येक वासनेला या आत्म्याचं बंधन हवं. म्हणून माणसाचा आत्मा सदैव जागृत असायला हवा! मद्याच्या धुंदीत असणाऱ्या सारथ्याच्या हातून लगाम निसटून जातात. घोडे सैरावैरा उधळतात. रथ खोल दरीत पडून त्याचा चक्काचूर होतो आणि आतला शूर धनुर्धर व्यर्थ प्राणाला मुकतो.’
जगानं माझ्याशी जसं वागावं, असं मला वाटतं, तसं मी जगाशी वागायला हवं,
‘मग मानवी जीवनाचा हेतू काय?’ ‘या शापातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणं. ययाति, इतर प्राण्यांना शारीरिक सुखदुःखांपलीकडची अनुभूती असत नाही. ती केवळ मनुष्याला मिळालेली देणगी आहे. या अनुभूतीच्या बळावरच मनुष्य पशुकोटीतून वर आला आहे. संस्कृतीच्या दुर्गम पर्वताची चढण तो चढत आहे. आज ना उद्या तो त्या गिरिशिखरावर जाईल. मग या सर्व शापांतून त्याचं जीवन मुक्त होईल. एक गोष्ट कधीही विसरू नकोस— शरीरसुख हा काही मानवी जीवनाचा मुख्य निकष नाही. तो निकष आहे आत्म्याचं समाधान!’
पण मृत्यू हे मोठे भयंकर अस्वल आहे. कितीही उंच झाडावर चढून बसले, तरी तिथे ते माणसाचा पाठलाग करते. कुठेही लपून बसा, ते काळे, कुरूप प्रचंड धूड आपला वास काढीत येते. त्याच्या गुदगुल्यांनी प्राण कंठी येतात.
देवयानी हसू लागली. ते हास्य नुसत्या प्रेयसीचे नव्हते. ते एका मानिनीचेही होते! रूपाच्या बळावर आपण पुरुषाला शरण आणू शकतो, या अहंकाराची धुंदी चढलेल्या रमणीचे हास्य होते ते!
‘मानवी जीवनात आत्या हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी आणि मन हा लगाम आहे. विविध इंदियं हे घोडे, उपभोगाचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग आणि इंद्रियं व मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता आहे.’ रथच नसला, तर धनुर्धर बसणार कुठं? तो त्वरेनं रणांगणावर जाणार कसा? शत्रूशी लढणार कसा? म्हणून व्यक्तीनं शरीररूपी रथाची किंमत कधीच कमी लेखता कामा नये.
समुद्र शिंपल्यात घालून कधी कुणाला दाखविता येईल का? फुलाचे चित्र काढून त्याचा सुगंध कुणाला देता येईल का? प्रीतीची अनुभूतीसुद्धा अशीच आहे!
मृत्यू! जीवनातले केवढे भयंकर रहस्य आहे हे! समुद्राच्या किनाऱ्यावर लहान मूल वाळूचा किल्ला बांधते. भरतीची एक मोठी लाट येते आणि तो किल्ला कुठल्या कुठे नाहीसा होऊन जातो. त्या वाळूच्या किल्ल्यापेक्षा माणसाचे जीवन काय निराळे आहे? माधव म्हणून आपण ज्याचा गौरव करतो, परमेश्वराची इहलोकातली प्रतिमा म्हणून आपण ज्याच्या कर्तृत्वाची पूजा करतो, तो कोण आहे? विश्वाच्या विशाल वृक्षावरले एक चिमणे पान!
म्हणूनच संसार यज्ञाइतकाच पवित्र मानला आहे. सर्वसामान्य माणसाचा तोच धर्म आहे. शुक्राचार्य, कच, यति यांच्यासारख्या तपस्व्यांनी जगाच्या कल्याणाची काळजी वाहावी; इंद्र, वृषपर्वा, ययाति यांच्यासारख्या मोठमोठ्या राजांनी आपली प्रजा सुखी कशी राहील, हे पाहावे आणि सर्वसामान्य संसारी माणसांनी आपली बायकामुले, स्नेहीसोबती व संबंधित माणसे यांच्या उन्नतीची चिंता करावी. या सर्वांनी आपले सुख जगातल्या दुसऱ्या कुणाच्याही दुःखाला कारणीभूत होत नाही ना, हे डोळ्यांत तेल घालून पाहिले पाहिजे. व्यक्तिधर्म, संसारधर्म, राजधर्म, यतिधर्म सर्व सारख्याच योग्यतेचे धर्म आहेत. यांपैकी कुठल्याही धर्माला जीवनाचा तिरस्कार करण्याचा
...more
आईचे मन किती वेडे असते! त्याला वाटते, आपल्या बाळाने लवकर लवकर मोठे व्हावे, खूपखूप मोठे व्हावे. मोठेमोठे पराक्रम करावेत; विजयी वीर म्हणून सगळ्या जगात गाजावे. पण त्याच वेळी त्याला वाटत असते, आपले बाळ सदैव लहान राहावे, आपल्या सावलीत ते सदैव सुरक्षित असावे, कळिकाळालासुद्धा त्याच्या केसाला धक्का लावता येऊ नये!
ऋषिमुनी अरण्यात जाऊन तपश्चर्या का करतात, हे या वनवासात मला कळले. निसर्ग आणि मनुष्य यांचे अनादी आणि अनंत असे निकटचे नाते आहे. हे दोघे जुळे भाऊच आहेत. म्हणूनच मनुष्य निसर्गाच्या सहवासात असला, म्हणजे जीवन आपल्या सत्यस्वरूपात त्याच्यापुढे प्रगट होते. जीवनाची शक्ती कुठली आणि त्याच्या मर्यादा कुठल्या, हे माणसाला कळू लागते. निसर्गापासून मनुष्य दूर गेला, की त्याचे जीवन एकांगी होऊ लागते. त्या कृत्रिम, एकांगी जीवनात त्याच्या कल्पना, भावना, वासना या सर्वच गोष्टी अवास्तव किंवा विकृत स्वरूप धारण करतात.
महाराणी देवयानीच्या पुत्राचा पराभव? अखिल विश्वात तपस्वी म्हणून गाजलेल्या शुक्राचार्यांच्या नातवाचा पराजय? छे! हे शब्दसुद्धा खोटे वाटतात! भुतासारखे भासतात!
अष्टौप्रहर विलासमग्न राहायचा त्यांचा क्रम सुरू झाला. पहिल्यापहिल्यांदा हे ऐकले, की माझ्या मनाला विंचू डसल्यागत वेदना होत. स्त्री-पुरुषांमधल्या प्रेमसंबंधांची शिसारी येई. परमेश्वराने हे आकर्षण निर्माण केले नसते, तर जग किती सुखी झाले असते, असे वाटू लागले.
स्वतःसाठी जगण्यात जेवढा आनंद आहे, त्याच्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगण्यात— दुसऱ्यासाठी मरण्यात— शतपटींनी अधिक आनंद आहे!
कोणत्याही प्रकारचा उन्माद म्हणजे मृत्यू! नेहमीच्या मृत्यूहून हा मृत्यू फार भयंकर असतो. कारण, त्यात माणसाचा आत्माच मृत होतो.
उपभोग घेऊन वासना कधीही तृप्त होत नाही. आहुतींनी अग्नी जसा अधिकच भडकतो, तशी उपभोगाने वासनेची भूक अधिक वाढते!
* ‘न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते ।’ * कामेच्छा ही अधिकाधिक उपभोगाने शांत होत नाही. यज्ञातील अग्नि हविर्द्रव्यांमुळे आहुतींमुळे) जसा अधिकच भडकतो, तसेच कामेच्छेचे आहे.
उठल्या-सुटल्या शरीराची पूजा करीत सुटणाऱ्या आणि इंद्रियसुखे हीच जीवनातील सर्वश्रेष्ठ सुखे मानणाऱ्या मनुष्याला— मग तो जुन्या काळातील ययाति असो अथवा नव्या काळातील कुणी अतिरथी-महारथी असो— स्वतःच्या या सुप्त शक्तींची जाणीव असत नाही. पण मानवाची आत्मिक शक्ती— पशुपक्ष्यांहून भिन्न आणि उच्च अशी अनेक सामर्थ्ये सृष्टीने त्याला दिली असल्यामुळे, पिढ्यान् पिढ्या त्या सामर्थ्याची बीजे पेरून नवी नवी पिके काढण्याचे स्वातंत्र्य त्याला लाभले असल्यामुळे आणि या प्रगतीच्या प्रयत्नात धर्म, नीती, कला, शास्त्र, संस्कृती, इत्यादी नव्या सामर्थ्यांचा साक्षात्कार त्याला होत असल्यामुळे, वृद्धिंगत होऊ शकणारी आत्मिक शक्ती—
...more
कच हा असा विकसित आत्मा आहे. अणुबाँब आणि हैड्रोजन बाँब यांच्याकडे भीतिग्रस्त दृष्टीने पाहणाऱ्या जगाला जो नवा मानव हवा आहे, त्याचा तो पुराणकाळातील प्रतिनिधी आहे. नीतीची प्रगती अंती मानवी मनाच्या विकासावर आणि मानवी आत्म्याच्या विशालतेवर अवलंबून असते; हे या कादंबरीत आपल्या वाणीने आणि कृतीने त्याने अनेकदा सूचित केले आहे. जगात शांती नांदावी, म्हणून बड्या बड्या सत्ताधाऱ्यांनी (या कादंबरीतला शुक्राचार्य हा त्यांचा प्रतिनिधी आहे!) केवळ सदिच्छा व्यक्त केल्याने काही शांती प्रस्थापित होणार नाही; त्यांनी आपले व आपल्या देशांचे विविध मनोविकार आधी नियंत्रित केले पाहिजेत. वैयक्तिक व सामाजिक जीवनात वासनांचे आणि
...more
आजचा मनुष्य त्या जुन्या पोलादी चौकटीतून मुक्त झाला आहे. त्याच्या पायांतल्या निरर्थक रूढींच्या बेड्या गळून पडल्या आहेत. हे जे झाले, त्यात काही गैर आहे, असे नाही! हे होणे आवश्यक होते, अपरिहार्य होते, स्तंभातून प्रगट होणारा नरसिंह सामान्य मनुष्याला खोटा वाटू लागला, म्हणून हळहळण्याचे काही कारण नाही; पण त्या मनुष्याला अजून स्वतःच्या अंतःकरणातल्या देवाचा पत्ता लागला नाही, ही खरी दुःखाची गोष्ट आहे! आजचा मनुष्य मूर्तिभंजक झाला आहे, याचे मला वाईट वाटत नाही; पण समोर दिसेल ती मूर्ती फोडणे हाच आपला छंद आहे, अशी जी त्याची समजूत होऊ पाहत आहे— आणि भल्याभल्यांकडून तिची जी भलावणा केली जात आहे— ती मानवतेच्या
...more
पण कुणाही व्यक्तीने सुखासाठी जी धडपड करायची असते, ती इतर व्यक्तींच्या सुखाला छेद देऊन नव्हे, तर त्यांतल्या प्रत्येकाचे सुख आपल्या सुखाइतकेच महत्त्वाचे आहे, असे मानून! जत्रेतल्या गर्दीत प्रत्येक मनुष्याने दुसऱ्याला आपला धक्का लागणार नाही, ही काळजी जशी घ्यायला हवी, तशीच समाजाच्या सर्व लहानथोर घटकांनीही आपले सुख हे दुसऱ्याचे दुःख होणार नाही, अशी दक्षता घेतली पाहिजे!
संयम म्हणजे आपले स्वातंत्र्य गमावणे नव्हे, तर दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला अवसर देणे होय, हे तो विसरणार नाही, तोपर्यंत मानवाचे भवितव्य भीषण होईल, अशी भीती बाळगण्याचे कारण नाही.
म्हणूनच वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही प्रकारच्या जीवनांत मनुष्याच्या सर्व वासना एका मर्यादेपर्यंत सुजाण पद्धतीने तृप्त होण्याची सोय असली पाहिजे आणि त्या मर्यादेनंतर त्या नियंत्रित कशा करता येतील, याचीही काळजी, व्यक्तीने आणि समाजाने घेतली पाहिजे.