“त्या विद्या अशा – ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. या चार वेदांच्या चार स्वतंत्र आद्यविद्या मानल्या आहेत. ‘विद’ म्हणजे जाणणं. ‘वेद’ म्हणजे जे जाणलं ते सांगितलं. हे चारही वेद दूर गांधार देशात ‘माल्यवत’ पर्वतावर निर्माण झाले. अनेक अनाम, प्रज्ञावंत ऋषींनी ते उत्स्फूर्तपणे मौखिक कथन केले. पिढ्यान्पिढ्या कुठं व कधीच त्यांनी आपले नामनिर्देश केले नाहीत. म्हणून या चारी वेदांना ‘अपौरुषेय’ मानण्यात येतं.