“जशा चौदा विद्या आहेत, तशा जीवनाला सर्वांगसुंदर व परिपूर्ण करणाऱ्या कला आहेत, चौसष्ट! शक्यतो त्या सर्वच तुम्हाला अर्थांसह यथाक्रम विकलून दाखवीन मी. या कलांत सर्वश्रेष्ठ पहिली कला आहे, ती म्हणजे ‘संगीत’ . सा, रे, ग, म, प, ध, नि असे तिचे अमर सप्तसूर आहेत. खर्ज, पंचम, सप्तक अशा त्यांच्या गती आहेत. भूप, मल्हार, यमन, मालकंस, कानडा, आसावरी, भैरवी अशा कितीतरी विविध राग, उपरागांचा विशाल वटवृक्ष हे मूळ सप्तसूर समर्थपणे पेलून धरतात. “संगीतच सर्वश्रेष्ठ ललितकला का? तर कुठल्याही मध्यस्थाशिवाय संगीत श्रोत्यांच्या थेट आत्म्यालाच भिडू शकतं. संगीताच्या एका आलापात सांगता येईल ते महाकाव्याच्या एका पर्वातही नाही
...more