More on this book
Community
Kindle Notes & Highlights
माझ्या मनात मुरलीची एक सुरावट सर्रकन फिरली. पूर्ण झाली. ‘रा’ म्हणजे लाभो. ‘धा’ म्हणजे मोक्ष. ‘राधा’ म्हणजे मोक्ष लाभो म्हणून तळमळणारा जीव!
“त्या विद्या अशा – ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. या चार वेदांच्या चार स्वतंत्र आद्यविद्या मानल्या आहेत. ‘विद’ म्हणजे जाणणं. ‘वेद’ म्हणजे जे जाणलं ते सांगितलं. हे चारही वेद दूर गांधार देशात ‘माल्यवत’ पर्वतावर निर्माण झाले. अनेक अनाम, प्रज्ञावंत ऋषींनी ते उत्स्फूर्तपणे मौखिक कथन केले. पिढ्यान्पिढ्या कुठं व कधीच त्यांनी आपले नामनिर्देश केले नाहीत. म्हणून या चारी वेदांना ‘अपौरुषेय’ मानण्यात येतं.
“या चार वेदांच्या चार विद्या आहेत. तशीच त्यांची सहा अंगं आहेत. त्यातील जे पहिलं अंगं आहे, त्याला शिक्षा म्हणतात. शिक्षा म्हणजे वेदांच्या शब्दांच्या निर्दोष, योग्य व कर्णमधुर उच्यारांच शास्त्र होय. वेदांचं सर्व सामर्थ्य अचूक व स्पष्ट उच्चारांतच आहे. या उच्चारांचे म्हणजेच वाणीचे चार स्पष्ट प्रकार आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी असे. “वाणीचा वैखरी हा प्रकार सर्वांत गौण आहे. दैनंदिन व्यवहारात तो नित्य व नकळत योजला जातो. जीभ, ताळू, ओठ यांच्या साहाय्यानं केवल कंठातून सहज बाहेर येते, ती वाणी म्हणजे वैखरी. हिचा मनाशी, हृदयाशी, बुद्धीशी व आत्म्याशी काही संबंध असेलच असं नाही. रोज अशा मुखदेखल्या
...more
“धार्मिक विधी व संस्कार यांचा ऊहापोह ज्यात आहे, ते सहावं अंग म्हणजे ‘कल्प’ . या अंगात अकल्पित अवडंबरं केव्हाही घुसू शकतात! शहाण्यानं सदैव त्यांच्यापासून सावधच असलं पाहिजे. अशा माजलेल्या अवडंबरांच्याच पुढे अंधश्रद्धा व्हायला समय लागत नाही! अशा अंधश्रद्धांना कठोरपणं, पुरुषार्थानं निखंदतो, तो युगपुरुष, योगयोगेश्वर सिद्ध होतो. ‘अव’ म्हणजे खाली. तारण्यासाठी खाली येतो तो अवतार! भोवतीच्या असंख्य अंधश्रद्धाधारकांना तारण्यासाठी खाली उतरतो, तो अवतारी युगपुरुष ठरतो. युगंधर सिद्ध होतो!” आचार्य अंमळ थांबलेच. एकटक माझ्याकडेच रोखून बघत म्हणाले, “काय श्रीकृष्णाऽ समजलं काय ?”
“जशा चौदा विद्या आहेत, तशा जीवनाला सर्वांगसुंदर व परिपूर्ण करणाऱ्या कला आहेत, चौसष्ट! शक्यतो त्या सर्वच तुम्हाला अर्थांसह यथाक्रम विकलून दाखवीन मी. या कलांत सर्वश्रेष्ठ पहिली कला आहे, ती म्हणजे ‘संगीत’ . सा, रे, ग, म, प, ध, नि असे तिचे अमर सप्तसूर आहेत. खर्ज, पंचम, सप्तक अशा त्यांच्या गती आहेत. भूप, मल्हार, यमन, मालकंस, कानडा, आसावरी, भैरवी अशा कितीतरी विविध राग, उपरागांचा विशाल वटवृक्ष हे मूळ सप्तसूर समर्थपणे पेलून धरतात. “संगीतच सर्वश्रेष्ठ ललितकला का? तर कुठल्याही मध्यस्थाशिवाय संगीत श्रोत्यांच्या थेट आत्म्यालाच भिडू शकतं. संगीताच्या एका आलापात सांगता येईल ते महाकाव्याच्या एका पर्वातही नाही
...more