महाकाव्य रामायणाचा नायक राम स्वगुणांच्या बळावर ‘श्रीराम’ झाला. महाभारताचा नायक कृष्ण तसाच स्वगुणवत्तेच्या बळावर ‘श्रीकृष्ण’ झाला आहे. या दोन्ही महाकाव्यांत चुकूनही इतर व्यक्तिरेखांना ‘श्री’ उपाधी लावून श्रीलक्ष्मण, श्रीभरत किंवा श्रीअर्जुन, श्रीभीम म्हटलेलं नाही.