More on this book
Community
Kindle Notes & Highlights
महाकाव्य रामायणाचा नायक राम स्वगुणांच्या बळावर ‘श्रीराम’ झाला. महाभारताचा नायक कृष्ण तसाच स्वगुणवत्तेच्या बळावर ‘श्रीकृष्ण’ झाला आहे. या दोन्ही महाकाव्यांत चुकूनही इतर व्यक्तिरेखांना ‘श्री’ उपाधी लावून श्रीलक्ष्मण, श्रीभरत किंवा श्रीअर्जुन, श्रीभीम म्हटलेलं नाही.
या चिंतनात एक थरारक नवं आकलन मला स्पर्शून गेलं. ‘श्रीकृष्ण’, ‘भीष्म’, व ‘कर्ण’ या पंचमहाभूतांपैकी ‘जल’ या महत्त्वाच्या तत्त्वाच्या ‘जलपुरूष’ व्यक्तिरेखा आहेत. आपल्या भेटीत त्या एकमेकांना अबोल-मूकपणं आदर राखतात. बालपणी जन्मतःच पित्याच्या मस्तकावरून महापुरातील यमुनेत टोपलीतून जीवनप्रवासाचा प्रारंभ करणारा ‘श्रीकृष्ण’, तसाच जीवनारंभ अश्वनदी, चर्मण्वती, गंगा अशा नद्यांवरून पेटिकेतून खडतर प्रवास करणारा ‘कर्ण’ व साक्षात गंगा या जलमातेचाच पुत्र असलेला ‘गांगेय भीष्म’ यांच्या सुप्त-अबोध मनातील ‘जलपुरुष’ हे नातं पकडत वाटचाल केली, तर आपण या तिन्ही महान व्यक्तिरेखांच्या थेट गाभ्यांनाच भिडतो, हा माझा अनुभव
...more
श्रीकृष्णाला सखे अनेक, गुरू दोन, भगिनी तीन, माता-पिता दोन, पत्नी आठ, पुत्र ऐशी, कन्या चार; पण सख्या दोनच – पहिली राधा व दुसरी द्रौपदी. ‘राधा’ या जनमानसात पक्क्या रुजलेल्या व्यक्तिरेखेला भागवत, महाभारत, हरिवंशपुराण या श्रीकृष्णाशी निगडित अधिकृत संदर्भग्रंथांपैकी एकातही निसटताही संदर्भ नाही! उपस्थितांच्या एखाद्या दीर्घ यादीत तिचं नावसुद्धा नाही! काय करायचं राधेचं? असं आहे तर ही राधा श्रीकृष्णचरित्राला चिकटली तरी केव्हा? कशी? तर पंधराव्या शतकात ‘गीत गोविंद’ या शृंगाररसाला वाहून घेतलेल्या जयदेव कवीच्या अत्यंत जनप्रिय झालेल्या शृंगाररसप्रधान रसाळ खंडकाव्यातून श्रीकृष्णचरित्राला चिकटली.
चिंतनाच्या अटीतटीच्या या धुंदळीत कसा कुणास ठाऊक, पण कवडशासारखा एक विचार आला. तो विचार असा होता की – शतकेन्शतके श्रीकृष्णभक्त ‘राधेकृष्ण’ हा घोष घुमवीत आलेत. त्या ‘राधा’ या शब्दाचा नेमका मूकार्थ तरी काय आहे, तो एकदा नीट बघू या तरी! मग शब्दकोशांचा धांडोळा सुरू झाला. ज्या क्षणी मला ‘राधा’ शब्दाचा अचूक अर्थ गवसला त्या क्षणी माझ्यातील साहित्यकार थरारून उठला. आजही मी तो क्षण विसरू शकत नाही. ‘राधा’ हा जोडशब्द आहे! ‘रा’ म्हणजे लाभो-मिळो. ‘धा’ म्हणजे मोक्ष, जीवनमुक्ती! ‘राधा’ म्हणजे मोक्षासाठी तळमळणारा जीव! या शब्दार्थामुळं माझी संपूर्ण चिंतनतळी घुसळून निघाली. मी दूर सारलेली ‘राधा’ आता कितीतरी प्रचंड
...more
कृष्ण – किसन, कन्हैय्या, गोपाळ, गोविंद, मोहन, दामोदर, मुरलीधर, मधुसूदन, श्याम, मुकुंद, मिलिंद, माधव, श्रीकृष्ण, श्यामसुंदर, चक्रधर, गदाधर, अच्युत, नंदनंदन, यशोदानंदन, देवकीनंदन, द्वारकाधीश व वासुदेव