More on this book
Community
Kindle Notes & Highlights
रक्त! खरचं रक्त म्हणजे असतं तरी काय? तो असतो चैतन्यानं अखंड काळाला साक्षी देऊन दिलेला संस्कारशील हुंकार! पिढ्यानपिढ्याच्या दीर्घ साधनेच्या संस्कारशील वाटचालीनं लाभलेला.
‘जल’ म्हणजे ‘जायते यस्मात् च, लीयते यस्मिन इति जल:।’ पुत्रा, जीव ज्यातून जन्म घेतो आणि ज्यात लय पावतो, ते पंचमहाभूत म्हणजे जल. सर्वांत बलशाली व महत्त्वाचं आहे, हे महाभूत. जल म्हणजे जीवनच.