More on this book
Community
Kindle Notes & Highlights
आहे माझं? कशाला त्याच्याशी ही स्पर्धा करायची? स्पर्धा
ही नेहमीच माणसाला आंधळं करते.
आणि अपसमज करून एखाद्याबद्दल अनादर तर कधीच बाळगू नये.
माझ्यावरच्या प्रेमामुळे की अर्जुनाच्या द्वेषामुळे?
संयम, सहनशक्ती, औदार्य, त्याग, सहिष्णुता हे सगळे सद्गुण घोटीव दगडांच्या सुडौल मंदिरात बसून, धूपाच्या सुगंधात ऐकताना बरे वाटणारे केवळ पोकळ शब्द आहेत.
बलाढ्य आणि सूर्यासारखा तेजस्वी कर्ण सर्वस्वी आज माझ्या बाजूला होता! त्याचा एकमुखी कौल आज माझ्याच पक्षाला होता! जरी पराक्रमी असला तरी भोळा-भाबडा आहे तो!
वेड्या कर्णा, या दुर्योधनाला पुरता ओळखायला तुला फार दिवस लागतील.
जीवन ही मनाच्या असंख्य धाग्यांच्या वस्त्राची एक गाठ आहे! ती ज्याची त्यानंच सोडवायची असते!
मला आश्चर्य वाटे ते पितामह भीष्मांचं! ते पराक्रमी होते, वृद्ध होते, त्यांचा सर्वांवर वचक होता, सर्वांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. पांडवांविषयी मात्र ते फारच उदासीन वाटत! ते कधीही खांडववनाचं इंद्रप्रस्थात रूपांतर करणाऱ्या पांडवांना भेटायला गेले नाहीत! त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल कळवळून बोलले नाहीत! युवराज दुर्योधनांच्या पांडवद्वेषाला त्यांनी पुढाकार घेऊन स्वत: कधी आळा घातला नाही. राजमाता कुंतीदेवींना त्यांच्या या पडत्या काळातही त्यांनी मदतीचा हात दिला नाही. हे काहीतरीच घडत होतं. घडणारं सर्वच ते तटस्थपणे पाहत होते!