विस्मृती ही माणसाच्या जीवनातील किती प्रभावी शक्ती आहे! दैनंदिन जीवनात अशा कितीतरी असंख्य घटना घडत असतात; त्या सगळ्याच माणसाच्या मनात राहिल्या तर? त्यांचा परस्परांशी संबंध लावताना त्याचा मेंदू कातावून जाईल. वेड लागेल त्याला! म्हणून निसर्गानंच हे विस्मृतीचं अमोल देणं मानवाला दिलं असावं.