More on this book
Community
Kindle Notes & Highlights
तारुण्य! ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन! निसर्गानं मानवाला दिलेला सर्वांत श्रेष्ठ वर! जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग! निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत! मनाच्या मयूराचा पूर्ण पसरलेला पिसारा! फुललेल्या शरीर – भुजंगाचा डौलदार असा ठिपकेदार फणा! भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा! विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वांत ऐटदार घोडा! माणसानं मानानं मिरवायचा काळ! काहीतरी मिळवायचा काळ! शक्तीचा आणि स्फूर्तीचा काळ! काहीतरी करावं, असं खऱ्या – खऱ्या अर्थानं वाटणारा ध्येयवेडा काळ!
जीवनाच्या रथाचे वेग तारुण्याच्या सारथ्यानं आपल्या हाती घेतले. या रथाला पाच घोडे असतात! सामर्थ्य, महत्त्वाकांक्षा, निर्भयता, अभिमान आणि औदार्य!
जे सामर्थ्यशाली असतं तेच तारुण्य! प्रकाश कधीतरी काळा असतो काय? असलं सामर्थ्यशाली तारुण्यच आपल्याबरोबर इतरांचा मान वाढवितं. महत्त्वाकांक्षा हा तर तरुणाचा स्थायिभाव! मी मोठा होईन. परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकवीन ही तरुणाची उभारीची ऊर्मी असते! निर्भयता म्हणजे तरुणाच्या जीवन – संगीतातला सगळ्यांत उंच स्वर! भय हा या स्वराचा फुटलेला चिरका आवाज! चिरका आवाज कुणाला कधीतरी आवडेल का? जग उंच स्वराची तान ऐकायला उत्सुक असतं, चिरका आवाज नाही! अभिमान असतो तारुण्याचा आत्मा! ज्या माणसात श्रद्धा नाही तो माणूस नाही आणि ज्या तरुणात अभिमान नाही तो तरुण नाही. तरुण माणूस हा आपल्या श्रद्धांचा नेहमीच
...more
स्त्री म्हणजे विश्वकर्त्यानं आपल्या पहिल्याच साखरझोपेच्या वेळी टाकलेला एक हळुवार नि:श्वास असावा!
काळ म्हणजे तरी काय आहे? एक सारथीच नाही काय? मानवरूपी घोड्यांच्या पाठीवर आपल्या संकेतांचे आसूड मारीत केव्हा – केव्हा तो किती गतीनं पिटाळतो हे घोडे!
जीवन म्हणजे विश्वाच्या भयाण भुयारातून बाहेर पडण्यासाठी धडपडणारं पाखरू आहे,
स्त्री म्हणजे समाजाच्या कोंडवाड्यात सामाजिक संकेताच्या दाव्यानं जखडलेली गायच जणू! तिला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी खुल्या मनानं कधी बोलता येत नाहीत. जणू लक्ष-लक्ष दु:खं आकाशाच्या शांततेनं मूकपणे सहन करण्यासाठीच तिचा जन्म असतो!
विस्मृती ही माणसाच्या जीवनातील किती प्रभावी शक्ती आहे! दैनंदिन जीवनात अशा कितीतरी असंख्य घटना घडत असतात; त्या सगळ्याच माणसाच्या मनात राहिल्या तर? त्यांचा परस्परांशी संबंध लावताना त्याचा मेंदू कातावून जाईल. वेड लागेल त्याला! म्हणून निसर्गानंच हे विस्मृतीचं अमोल देणं मानवाला दिलं असावं.