‘‘मग तू तरी सांग ते दवबिंदू म्हणजे काय ते?’’ ‘‘कर्णा, हे दवबिंदू म्हणजे माणसाच्या जीवनाचं एक उत्कृष्ट प्रतीकच आहे! अरे दवबिंदूच का, निसर्गातली प्रत्येक वस्तू माणसाला काहीतरी धडा देण्यासाठीच विधात्यानं निर्माण केली आहे! पण मानवाचे डोळे उघडे मात्र हवेत. मन स्वच्छ हवं, तरच त्याला जग ही विधात्याची भव्य आणि अखंड पाठशाला आहे, हे कळेल आणि तो जगाच्या निर्मितीचं खरंखुरं रहस्य जाणून घेण्यासाठी तळमळणारा एक जिज्ञासू शिष्य होईल.’’ ‘‘अश्वत्थामा, पूर्वी तू कधीतरी माणसाचं जीवन श्रीफलासारखं असतं, असं म्हणाला होतास ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आता तू म्हणतोस की, हे दवबिंदूही मानवी जीवनाचं प्रतीक आहेत! कसं ते
‘‘मग तू तरी सांग ते दवबिंदू म्हणजे काय ते?’’ ‘‘कर्णा, हे दवबिंदू म्हणजे माणसाच्या जीवनाचं एक उत्कृष्ट प्रतीकच आहे! अरे दवबिंदूच का, निसर्गातली प्रत्येक वस्तू माणसाला काहीतरी धडा देण्यासाठीच विधात्यानं निर्माण केली आहे! पण मानवाचे डोळे उघडे मात्र हवेत. मन स्वच्छ हवं, तरच त्याला जग ही विधात्याची भव्य आणि अखंड पाठशाला आहे, हे कळेल आणि तो जगाच्या निर्मितीचं खरंखुरं रहस्य जाणून घेण्यासाठी तळमळणारा एक जिज्ञासू शिष्य होईल.’’ ‘‘अश्वत्थामा, पूर्वी तू कधीतरी माणसाचं जीवन श्रीफलासारखं असतं, असं म्हणाला होतास ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आता तू म्हणतोस की, हे दवबिंदूही मानवी जीवनाचं प्रतीक आहेत! कसं ते जरा स्पष्ट करशील काय?’’ ‘‘हे बघ कर्णा, हे दवबिंदू कुठून येतात आणि कुठं जातात हे कुणालातरी माहीत आहे काय? माणसाचंही तसंच आहे. तो कुठून येतो आणि कुठं जातो हे कुणालाही सांगता येत नाही. पुढं ऐक हं, कसं आहे ते - ‘‘हे दवबिंदू कुणाचातरी प्रकाश घेऊन चमकतात. इतके की, वाटावं जणूकाही प्रत्येक दवबिंदू हा एक छोटा आणि स्वतंत्र सूर्य आहे! हे चमचम करणारे दवबिंदू वायूच्या झुळकीसरशी मंद-मंद झोके घेतात. आपल्याजवळ असलेली प्रकाशकिरणं आपल्यापासून बाहेर फेकतात. त्यांच्याकडे पाहणाऱ्यांना आल्हाद देतात, परंतु जरा का वारा जोरात आला की, हे प्रसन्न, हसरे दवबिंदू खालच्या मातीत असंख्य जलबिंदू होऊन विरून जातात – का कू न करता – न आक्रोश करता!’’ ‘‘माणसांचंही अगदी असंच आहे. एकाच परमात्म्याची असंख्य रूपं घेऊन मानव म्हणून वावरणारे हे जीव – अरे, यातले काही जीव तर एवढे दिव्य असतात की, साक्षात परमात्माच वाटावेत! हे सारे आपलं जीवन जगत असतात. पुरुषार्थाच्या किरणांनी जग उजळतात. सौख्याच्या क्षणी आनंदानं डोलतात आणि मृत्यूची चाहूल ...
...more
This highlight has been truncated due to consecutive passage length restrictions.