मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजत होतं. कशी वागेल ती माझ्याबरोबर? माझा स्वभाव, माझं जीवन, ध्येय तिला बरोबर समजेल काय? कारण माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो. त्याच्या स्वभावात त्याच्या नकळत असंख्य दोष लपलेले असतात. बालपणापासून आजूबाजूच्या परिस्थितीचे पडसाद मनावर उमटलेले असतात. ते माणसाच्या स्वभावावर परिणाम केल्याशिवाय राहत नाहीत. क्षणोक्षणी ते प्रकट होत असतात. म्हणूनच परस्परांच्या स्वभावातले असे दोष पति-पत्नींना तरी नीट माहीत असावे लागतात. वैवाहिक जीवन म्हणजे दोन चक्रांचा रथ. पति-पत्नी ही ती दोन चक्रं. ही दोन्ही चक्रं ठीक समतोल असली तरच तो चालतो. नाहीतर अंती तो धरणीत रुततो! ज्यांना हे पटत नाही ते केवळ
...more