More on this book
Community
Kindle Notes & Highlights
श्रद्धा ही सामर्थ्यवान असते. कशावरतरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस जिवंत असूच शकत नाही.
तारुण्य! ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन! निसर्गानं मानवाला दिलेला सर्वांत श्रेष्ठ वर! जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग! निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत! मनाच्या मयूराचा पूर्ण पसरलेला पिसारा! फुललेल्या शरीर – भुजंगाचा डौलदार असा ठिपकेदार फणा! भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा! विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वांत ऐटदार घोडा! माणसानं मानानं मिरवायचा काळ! काहीतरी मिळवायचा काळ! शक्तीचा आणि स्फूर्तीचा काळ! काहीतरी करावं, असं खऱ्या – खऱ्या अर्थानं वाटणारा ध्येयवेडा काळ!
सामर्थ्य, महत्त्वाकांक्षा, निर्भयता, अभिमान आणि औदार्य!
आपल्या मूर्खपणानं आपल्याच विनाशाचे खड्डे खणणारा मानव हा या जगातला एकमेव प्राणी असावा!
केवळ याच बाह्य गोष्टींवर सौख्य अवलंबून असतं असं नाही. मनाचं स्वास्थ्य असेल तरच जीवन सुखी असतं.
खरोखरच विस्मृती ही माणसाच्या जीवनातील किती प्रभावी शक्ती आहे!
प्रेम हा मानवी मनाचा सर्वांत नि हवाहवासा वाटणारा एकमेव आविष्कार आहे.
शोक हा दु:खावरचा शेवटचा उपाय नाही. घडणारी प्रत्येक घटना अटळ असते. तिला काहीतरी तसाच गूढ अर्थ असतो. काहीतरी कारण असतं. जगात एकही घटना निरर्थक नसते.
मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजत होतं. कशी वागेल ती माझ्याबरोबर? माझा स्वभाव, माझं जीवन, ध्येय तिला बरोबर समजेल काय? कारण माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो. त्याच्या स्वभावात त्याच्या नकळत असंख्य दोष लपलेले असतात. बालपणापासून आजूबाजूच्या परिस्थितीचे पडसाद मनावर उमटलेले असतात. ते माणसाच्या स्वभावावर परिणाम केल्याशिवाय राहत नाहीत. क्षणोक्षणी ते प्रकट होत असतात. म्हणूनच परस्परांच्या स्वभावातले असे दोष पति-पत्नींना तरी नीट माहीत असावे लागतात. वैवाहिक जीवन म्हणजे दोन चक्रांचा रथ. पति-पत्नी ही ती दोन चक्रं. ही दोन्ही चक्रं ठीक समतोल असली तरच तो चालतो. नाहीतर अंती तो धरणीत रुततो! ज्यांना हे पटत नाही ते केवळ
...more
खरोखर स्त्रीच्या सौंदर्यात किती प्रभावी सामर्थ्य असतं! नियंता हा जर एक जग रंगविणारा कुशल रंगारी असेल, तर स्त्री ही त्यानं रंगवलेली सर्वश्रेष्ठ रंगकृती म्हटली पाहिजे. सर्व जग रंगवून झाल्यावर शेवटी निर्वाणीच्या हातानं आणि सर्वांत प्रभावी कुंचल्यानं रंगविलेली पूर्णाकृती!
‘‘मग तू तरी सांग ते दवबिंदू म्हणजे काय ते?’’ ‘‘कर्णा, हे दवबिंदू म्हणजे माणसाच्या जीवनाचं एक उत्कृष्ट प्रतीकच आहे! अरे दवबिंदूच का, निसर्गातली प्रत्येक वस्तू माणसाला काहीतरी धडा देण्यासाठीच विधात्यानं निर्माण केली आहे! पण मानवाचे डोळे उघडे मात्र हवेत. मन स्वच्छ हवं, तरच त्याला जग ही विधात्याची भव्य आणि अखंड पाठशाला आहे, हे कळेल आणि तो जगाच्या निर्मितीचं खरंखुरं रहस्य जाणून घेण्यासाठी तळमळणारा एक जिज्ञासू शिष्य होईल.’’ ‘‘अश्वत्थामा, पूर्वी तू कधीतरी माणसाचं जीवन श्रीफलासारखं असतं, असं म्हणाला होतास ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आता तू म्हणतोस की, हे दवबिंदूही मानवी जीवनाचं प्रतीक आहेत! कसं ते
...more
This highlight has been truncated due to consecutive passage length restrictions.
आशा हीच जीवनाची सर्वांत महान शक्ती असते.
पराक्रमाचं मातृत्व पुरुषाकडे असतं, पण मातृत्वाचा पराक्रम केवळ स्त्रीच करू जाणते! मातृत्व ही स्त्रीची सर्वांत श्रेष्ठ आणि सहजसुंदर अशी साधना असते!
द्वेष, तिरस्कार, स्वार्थ, असूया, हव्यास, दंभ, ढोंग, क्रौर्य, क्रोध, किंकर्तव्यता, अज्ञान, अहंभव, आसक्ती, स्तुती,, आत्मस्तुती, कारुण्य, वात्सल्य, भक्ती, सार्थकता, ममता, प्रेम, काम, अगतिकता, उद्वेग, आत्मपीडन, मत्सर, मोह, असाह्यता, नैराश्य आणि वैफल्य! किती अगणित सुरकुत्या ह्या! व्यक्तिव्यक्तीच्या जीवनवसनाला घेरून राहिलेल्या.’’
‘‘श्रद्धा म्हणजे काटेरी जीवनावरची हिरवळ! स्वत:वरच श्रद्धा हवी. ज्याची स्वत:वर – स्वत:च्या दिव्य स्वरूपावर श्रद्धा नाही तो जगासाठी, इतरांसाठी काहीच करू शकत नाही.’’
जीवन म्हणजे जन्ममरणाच्या तासांतून अविरत वाहणारी सरिता! परमात्मारूपी सागराला मिळण्यासाठी आसुसलेली! मुक्तीसाठी तळमळणारी!
व्यक्ती, मग ती कितीही श्रेष्ठ असो, त्यागी असो, योजनाकुशल असो तिच्यासाठी समाज कधीच थांबणार नाही! समाजाची अखंड गंगा वाहतच राहणार! आतील जलबिंदू बदलतील, आजचे जातील, उद्या नवे येतील, गंगा तशीच वाहत राहील.