‘‘मग त्यांनी लवकर आत्महत्या करावी, असंच तुझं सरळ-सरळ मत असेल?” ‘‘मुळीच नाही! जे जीवन मिळविण्याचा अधिकार नाही ते गमावण्याचाही अधिकार कुणाला नाही. आत्महत्या म्हणजे भावविवश मनाचा आत्म्यावर सरळ बलात्कार!” ‘‘मग अशा लोकांनी करावं तरी काय? केवळ मरेपर्यंत जगावं की, मरण जगत असताना जीवन जगत असल्याचं खोटं-खोटं ढोंग करावं?” ‘‘नाही! अशांनी सहनशील धरतीकडे पाहावं. तिच्यासारखी असंख्य आघात सहन करण्याची स्वत:ची शक्ती वाढवावी. शारीरिक, सांपत्तिक व लौकिक नव्हे; तर आत्मिक! आणि मगच योग्य वेळी अनंतात विलीन होऊन जावं. आत्म्याच्या संक्रमणाचे अनुभव समृद्ध करून जावं, कारण कुणीही कधीच विसरू नये की, काळ हा अखंड आहे. जीवन
...more