‘‘जीवनाचा उद्देश प्रकाश आहे; पण तो अगदी अंतिम असा उद्देश आहे! तो साध्य होण्यासाठी अनुभूतीची जरुरी आहे. निरनिराळ्या भावविभावांची अनुभूती! विविध अनुभव घेतल्यानंतरही ‘मी शोधतो आहे ते हे नव्हे!’ असं समजून आल्यानंतर मानव अंती आपल्या अंतरात्म्याकडे वळेल! त्याला तसं वळावंच लागेल! अटळ म्हणून स्वीकारावा लागणारा मानवजातीपुढचा अध्यात्म हाच एकमेव मार्ग राहील!’’