“दुर्योधनानं पांडवांना राज्य देण्याबाबत प्रखर विरोध दर्शविला, हे राज्य केवळ कौरवांचंच आहे, पांडवांचं नाही अशी त्याची मनोमन श्रद्धा आहे म्हणूनच ना?’’ ‘‘मुळीच नाही! स्वार्थ म्हणजे स्वत:वरची श्रद्धा नव्हे! चूक होते ती नेमकी इथंच!’’ ‘‘स्वार्थ झाला तरी तो चूक कसा? निसर्गानंच तो विचार मानवाला दिला आहे की नाही?” ‘‘स्वार्थाची जाणीव ही चूक नसेलही, पण या जाणिवेला मर्यादा असावी लागते. एक जीभ या इंद्रियाचंच स्वरूप घे. एखाद्यानं ठरविलं की, जगात अस्तित्वात असलेल्या सर्व रसांचा आस्वाद घ्यायचा! अगदी मनसोक्त! आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी राक्षसी हव्यासानं तो एकसारखा जीवनभर धावत राहिला, तरी त्याला त्याचं जीवन
...more