‘‘श्रद्धा! कशाकशावर ठेवावी माणसानं श्रद्धा? श्रद्धा म्हणजे तरी नेमकं काय?’’ त्याला चेतावून त्याची रसवंती फुलविणं हा माझा नित्याचा परिपाठ होता. ‘‘श्रद्धा म्हणजे काटेरी जीवनावरची हिरवळ! स्वत:वरच श्रद्धा हवी. ज्याची स्वत:वर – स्वत:च्या दिव्य स्वरूपावर श्रद्धा नाही तो जगासाठी, इतरांसाठी काहीच करू शकत नाही.’’