More on this book
Community
Kindle Notes & Highlights
रूप दिसत होतं त्यांचं! मला दिसणारी त्यांच्या रोजच्या तेजाची वलयं. एका दिवसाची दर्शनशोभा दुसऱ्या दिवशी तशीच नसे. तिच्यात दुसऱ्या दिवशी आगळीच खुमारी चढे.
कुणाचातरी स्पर्श माझ्या खांद्याला झाला असावा.
क्षणभर तरी स्थिर बसणं याला माहीत आहे काय?’’ आमचे हे संवाद माद्री मात्र एका कोपऱ्यात
काळवंडून गेला आहे! तुला वाटतं आहे की, आपल्या पायांखालची वाळू आता
प्रत्यक्ष सूर्यपुत्र असूनसुद्धा तुझ्यावर हे काजवे थुंकताहेत!
जे लाचार आणि दुर्बल असतात तेच केवळ असल्या दुसऱ्याच्या कृपेची ऐट धरतात.
माझ्या मते जगात एकच सद्गुण श्रेष्ठ आहे! जगात केवळ एकच कल्पना चिरंतन असते, शाश्वत असते! आजपर्यंत हे जग एकाच बिंदूपुढं नमलं आहे. तो सद्गुण म्हणजे सामर्थ्य! सामर्थ्याशिवाय माणूस म्हणजे मुळाशिवाय वटवृक्ष आणि मुठीशिवाय खड्ग!
ज्याला धाडसाची आवड नाही तो पुरुषच नव्हे.
ज्याच्या-त्याच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब ज्याच्या-त्याच्या मनाच्या दर्पणात स्पष्ट पडलेलं असतं.
स्त्रीनं मनात आणलं तर तिला आपल्या पतीच्या विध्वंसक क्रोधाचं रूपांतर शालीन कर्तृत्वात करता येतं!
फुलाच्या परागदंडात लपलेली कृमीसुद्धा सत्संगतीनं देवमूर्तींवर चढविली जाते.’’
श्रद्धा म्हणजे काटेरी जीवनावरची हिरवळ! स्वत:वरच श्रद्धा हवी. ज्याची स्वत:वर - स्वत:च्या दिव्य स्वरूपावर श्रद्धा नाही तो जगासाठी, इतरांसाठी काहीच करू शकत नाही.’’
मुक्ती म्हणजे आविरत अखंड प्रकाश! चैतन्यमय, प्रकाशमय, शरीरहीन, भावहीन अस्तित्व! आत्म्याचा एकच एक असलेला भाव, प्रकाश! जरा डोळसपणे सभोवती पाहशील तर सारं जीवन चराचर प्रकाशासाठी कसं नुसतं कणकणांनी आसुसलेलं आहे, हे पाहून तू दिङ्मूढ होशील. कृमी,
कीटक दीपज्योतीवरच का झेपावतात? वनस्पती, लतावेली, तृणांकुर सर्व आपआपलं मुख आकाशाच्या रोखानं उंचावून प्रकाशासाठीच का तळमळतात? कुणालाच हे विसरून चालणार नाही की, जीवनाचा स्थायिभावच प्रकाश आहे!’’
पाषाणाच्या प्रतिकूल माथ्यावर पाय रोवून ते रोप जणू म्हणतंय, ‘मला जगायचं आहे, वायुलहरींवर डोलायचं आहे.’’
‘दात कधी वाटेल तिथं खुपसायचे नसतात, आणि एकदा खुपसल्यानंतर मोडले तरी ते कधीच बाहेर खेचायचे नसतात.’
परस्परांवर दारिद्र्यात आणि वैभवात सारखंच प्रेम करणारी.
मानवतेचा अवमान एकवेळ क्षम्य ठरू शकतो - पण ज्या स्त्रीच्या कुशीतून मानवता जन्म घेते त्या स्त्रीत्वाचा एवढा निर्घृण अवमान कधीच क्षम्य नसतो. ज्या समाजात आणि राष्ट्रात स्त्रीत्व लज्जित होतं तो समाज आणि ते राष्ट्र विनाशाच्या खोल गर्तेच्या काठावर आपसूक जाऊ शकतं!