कर्णा, हे दवबिंदू म्हणजे माणसाच्या जीवनाचं एक उत्कृष्ट प्रतीकच अाहे! अरे दवबिंदूच का, निसर्गातली प्रत्येक वस्तू माणसाला काहीतरी धडा देण्यासाठीच विधात्यानं निर्माण केली अाहे! पण मानवाचे डोळे उघडे मात्र हवेत. मन स्वच्छ हवं, तरच त्याला जग ही विधात्याची भव्य अाणि अखंड पाठशाला अाहे, हे कळेल अाणि तो जगाच्या निर्मितीचं खरंखुरं रहस्य जाणून घेण्यासाठी तळमळणारा एक जिज्ञासू शिष्य होईल.’’