विधात्यानं निर्माण केलेल्या जीवसृष्टीतील माणूस हाच सर्वांत क्रूर प्राणी आहे! तरीही विद्वान लोक मानवाला सुसंस्कृत मानतात. मानव श्रेष्ठ प्राणी आहे, पण केव्हा, जर तो स्वार्थ टाकून इतरांसाठी रक्ताचा कणन्कण झिजवीत असेल तर! नाहीपेक्षा मानव धर्म, भवितव्य, राज्यकारभार यांच्या कितीही वल्गना करीत असो त्या कवडीमोलाच्याच आहेत! माणसाला सगळ्यात मोठा शाप कोणता असेल तर तो स्वार्थाचा!