कुणी म्हणतात, आठवणी म्हणजे मोरपिसांसारख्या असतात, तर कुणी म्हणतात, त्या बकुलफुलांसारख्या आपला सुगंध मागं दरवळत ठेवणाऱ्या असतात! पण मला मात्र ते कधीच पटत नाही. आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायांसारख्या असतात! त्या आपला खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागं ठेवूनच जातात.