काय आहे, हे मन म्हणजे? जगातील प्रत्येक माणूस म्हणजे मनोभावनांच्या असंख्य दोरखंडांशी जखडलेला एक हत्तीच नसतो काय? जिथल्या तिथं एकसारखा हलणारा! अस्वस्थ! तरीही स्वत:ला स्वतंत्र आणि सामर्थ्यवान समजणारा! आणि ज्याला ‘मन, मन’ म्हणतात ते म्हणजे तरी दुसरं-तिसरं काय आहे? तो एक खेकडाच नसतो काय? किती असंख्य भावनांच्या नांग्या असतात त्याला! वळवळणाऱ्या, आपली तीक्ष्ण टोकं आसपासच्या वाळूत रुतविणाऱ्या! तरीही एकमेकींना आधार देत-देत मधल्या देहाचं ओझं तसंच पुढं-पुढं ओढणाऱ्या! माणसाच्या भावभावना अशाच नाहीत काय? प्रेम, द्वेष, त्याग, लोभ, स्नेह, तिरस्कार, ममता, क्रोध सगळ्या-सगळ्या त्या मनाच्या नांग्या! स्वत:च्या
...more