More on this book
Community
Kindle Notes & Highlights
कुणी म्हणतात, आठवणी म्हणजे मोरपिसांसारख्या असतात, तर कुणी म्हणतात, त्या बकुलफुलांसारख्या आपला सुगंध मागं दरवळत ठेवणाऱ्या असतात! पण मला मात्र ते कधीच पटत नाही. आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायांसारख्या असतात! त्या आपला खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागं ठेवूनच जातात.
तारुण्य! ज्वलंत धमन्यांचं आविरत स्पंदन! निसर्गानं मानवाला दिलेला सर्वांत श्रेष्ठ वर! जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग! निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत! मनाच्या मयूराचा पूर्ण पसरलेला पिसारा! फुललेल्या शरीर-भुजंगाचा डौलदार असा ठिपकेदार फणा! भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा! विश्वकर्त्याच्या आविरत धावणाऱ्या रथातील सर्वांत ऐटदार घोडा! माणसानं मानानं मिरवायचा काळ! काहीतरी मिळवायचा काळ! शक्तीचा आणि स्फूर्तीचा काळ! काहीतरी करावं, असं खऱ्या-खऱ्या अर्थानं वाटणारा ध्येयवेडा काळ!
काय आहे, हे मन म्हणजे? जगातील प्रत्येक माणूस म्हणजे मनोभावनांच्या असंख्य दोरखंडांशी जखडलेला एक हत्तीच नसतो काय? जिथल्या तिथं एकसारखा हलणारा! अस्वस्थ! तरीही स्वत:ला स्वतंत्र आणि सामर्थ्यवान समजणारा! आणि ज्याला ‘मन, मन’ म्हणतात ते म्हणजे तरी दुसरं-तिसरं काय आहे? तो एक खेकडाच नसतो काय? किती असंख्य भावनांच्या नांग्या असतात त्याला! वळवळणाऱ्या, आपली तीक्ष्ण टोकं आसपासच्या वाळूत रुतविणाऱ्या! तरीही एकमेकींना आधार देत-देत मधल्या देहाचं ओझं तसंच पुढं-पुढं ओढणाऱ्या! माणसाच्या भावभावना अशाच नाहीत काय? प्रेम, द्वेष, त्याग, लोभ, स्नेह, तिरस्कार, ममता, क्रोध सगळ्या-सगळ्या त्या मनाच्या नांग्या! स्वत:च्या
...more
जीवन म्हणजे पूर्णत्वासाठी अनंताकडून अनंताकडे चालू असणारा अखंड प्रवास आहे!’’
मृत्यूच्या महाद्वारातसुद्धा ज्या श्रद्धेला तडा जात नाही तीच खरी श्रद्धा! खरा श्रद्धावंत कधीच अश्रद्ध होत नाही आणि परिस्थितीवर खापर फोडीत नाही.
श्रद्धा म्हणजे काटेरी जीवनावरची हिरवळ! स्वत:वरच श्रद्धा हवी. ज्याची स्वत:वर - स्वत:च्या दिव्य स्वरूपावर श्रद्धा नाही तो जगासाठी, इतरांसाठी काहीच करू शकत नाही.’’
विधात्यानं निर्माण केलेल्या जीवसृष्टीतील माणूस हाच सर्वांत क्रूर प्राणी आहे! तरीही विद्वान लोक मानवाला सुसंस्कृत मानतात. मानव श्रेष्ठ प्राणी आहे, पण केव्हा, जर तो स्वार्थ टाकून इतरांसाठी रक्ताचा कणन्कण झिजवीत असेल तर! नाहीपेक्षा मानव धर्म, भवितव्य, राज्यकारभार यांच्या कितीही वल्गना करीत असो त्या कवडीमोलाच्याच आहेत! माणसाला सगळ्यात मोठा शाप कोणता असेल तर तो स्वार्थाचा!
सर्वांत श्रेष्ठ मृत्यू कोणता? मनाच्या समाधानाच्या अत्युच्च शिखरावर असताना मानवाला गाठतो तो!
सामान्यांची दु:खं सामान्य असतात, असामान्यांची दु:खंही असामान्यच असतात!
मुक्ती किंवा सर्वश्रेष्ठ आत्मानुभव ही कधीही भिक्षा मागून मिळणारी वस्तू नव्हे! दुसऱ्यांनी अन्न खाऊन आपली भूक कधीच शमत नाही, दुसऱ्यांनी पाणी प्राशल्यानं आपली तृष्णा कधीच तृप्त होत नाही. अगदी तसंच कुणाच्याही केवळ उपदेशामुळे कुणाचाही कधीच उद्धार होत नाही. होणारही नाही! जिथं-जिथं