मृत्युंजय
Rate it:
Kindle Notes & Highlights
19%
Flag icon
खरोखरच विस्मृती ही माणसाच्या जीवनातील किती प्रभावी शक्ती आहे!
27%
Flag icon
गती आणि स्मृती यांचं काहीतरी गूढ नात असावं! नाहीतर गतिमान वाहनात स्मृतींची एवढी गर्दी का व्हावी?
31%
Flag icon
भिकारी, नास्तिक आणि घरभेदे यांना राज्यात कधीही थारा देऊ नये, कारण भिकारी आळस वाढवितात, नास्तिक शेकडो वर्षांची समाजरचना उधळून प्रत्येक गोष्टीबद्दल अनास्था निर्माण करतात. घरभेदे तर राज्याचा समूळ नाश करतात.
31%
Flag icon
सामर्थ्य आल्यावरच धर्माची सेवा करण्याची घोषणा करावी! कारण सत्य म्हणजे संपत्तीचा दास आणि धर्म म्हणजे सामर्थ्याचा दास!
42%
Flag icon
मी त्याला घेता-घेता म्हणे, ‘‘अजून दोन वर्षांचा नाहीतर त्याला तुमची भाषा आत्ताच कळायला लागलीय. मोठा झाल्यावर तो माझं काहीच ऐकणार नाही!” ‘‘तसं कसं होईल वृषाली? तो कर्णाचा पुत्र आहे. तो मातेला कधीच विसरणार नाही!” ते अभिमानानं म्हणत.
69%
Flag icon
शोण, भाग्य ही मानवानं निर्माण केलेली सर्वांत भयानक भूल आहे! मानवी जीवनाला ती जोडून जो-तो सत्यापासून सदैव दूर पळू पाहतो. पात्रातून जाणाऱ्या त्या ओंडक्याकडे बघ. प्रत्येकाचं जीवन तसं आहे! लाटेला तोंड देत-देत जगण्यातच खरा अर्थ आहे!” त्यानं पात्राच्या दिशेनं बोट केलं.
80%
Flag icon
विस्मृती ही निसर्गानं मानवाला दिलेली सर्वांत श्रेष्ठ देणगी आहे!
87%
Flag icon
व्यक्ती, मग ती कितीही श्रेष्ठ असो, त्यागी असो, योजनाकुशल असो तिच्यासाठी समाज कधीच थांबणार नाही! समाजाची अखंड गंगा वाहतच राहणार! आतील जलबिंदू बदलतील, आजचे जातील, उद्या नवे येतील, गंगा तशीच वाहत राहील. मी तरी माझं जीवन एवढं मोलाचं का मानावं?