More on this book
Community
Kindle Notes & Highlights
कुतूहल हे अवखळ घोड्यासारखं असतं. संयमाचे कितीही वेग लावले तरी ते धावतच सुटतं.
जगात किती प्रकारची आणि कशाकशा स्वभावाची माणसं आहेत कोण जाणे! कुणाच्या कल्पनेतून ती निर्माण होतात? कशासाठी ती निर्माण होतात? या जगाचा तो कल्पक कारागीर तरी कोण आहे?
स्पर्धा ही नेहमीच माणसाला आंधळं करते.
जे बदलणं माणसाच्या हातात नसतं, त्याचा त्यानं इतका विचार करू नये आणि अपसमज करून एखाद्याबद्दल अनादर तर कधीच बाळगू नये.
आठवणी या झंझावातासारख्या असतात! त्या कुठूनही आणि कशाही येऊ शकतात, इतकंच नाही तर काही वेळा तर त्या मनाचं शांत सरोवर पार घुसळून सोडतात! कधी-कधी
कोणतीही विद्या ही एखाद्या रोपासारखी असते. तिला निष्ठेचं खत नि मनाच्या एकाग्रतेचं पाणी मिळालं तरच ती वाढते. याअभावी उलट ती मरण्याची शक्यता असते.
माणसाचं प्रेम हे धरतीसारखं असतं. अगोदर एक दाणा पेरावा लागतो. तेव्हाच धरती अनेक दाण्यांची टिचून भरलेलं कणीस देते. माणूसही तसाच असतो. प्रेमाचा एक शब्द मिळाला तर त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार असतो.
क्षितिजाला भिडणाऱ्या आकाशाच्याही पलीकडे तरुणाच्या दृष्टीची झेप जात असते. जे-जे गतिमान आणि प्रकाशमान असतं त्याची त्याला सहज-सुंदर ओढ असते. जिथं-जिथं आणि जे-जे अशक्य असेल ते-ते शक्य करण्याची अंगभूत ऊर्मी त्याच्यात असते. अशक्य हा शब्दच नसतो त्याच्या कोशात!
माता ही जगातील अशी एकच व्यक्ती असते की, जिच्या प्रेमाला व्यवहाराची तुला कधीच माहीत नसते. तिला माहीत असतं आपल्या पुत्रावर खरंखुरं प्रेम करणं.
क्रोध हा अगन्साीरखा असतो. अपसमजाचा वारा त्याला लागला तर त्याचा वणवा होतो. त्या वणव्यात इतर सर्व कोमल भावनांची जळून राख होते आणि हा वणवा एकदम पेटला की, आवरत नसतो.
मनाचं स्वास्थ्य असेल तरच जीवन सुखी असतं.
माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो. त्याच्या स्वभावात त्याच्या नकळत असंख्य दोष लपलेले असतात. बालपणापासून आजूबाजूच्या परिस्थितीचे पडसाद मनावर उमटलेले असतात. ते माणसाच्या स्वभावावर परिणाम केल्याशिवाय राहत नाहीत. क्षणोक्षणी ते प्रकट होत असतात. म्हणूनच परस्परांच्या स्वभावातले असे दोष पति-पत्नींना तरी नीट माहीत असावे लागतात. वैवाहिक जीवन म्हणजे दोन चक्रांचा रथ. पति-पत्नी ही ती दोन चक्रं. ही दोन्ही चक्रं ठीक समतोल असली तरच तो चालतो. नाहीतर अंती तो धरणीत रुततो!
कर्माच्या अटळ नियमांनी प्रत्येक मानवी जीव बद्ध आहे.
कोणतंही व्यसन हे कुठल्याही बुद्धिमान माणसालासुद्धा अध:पतनाच्या सखोल दरीत नेऊन पोहोचवू शकतं!’’