About the Book My Tale of Four Cities is the English version of Narlikars autobiography Chaar Nagrantale Majhe Vishwa written originally in Marathi. The book is divided in four parts. The first part represents the early years (1-19) in Banaras (Varanasi). The second describes the authors stay in Cambridge, England first as a student and then continuing as a Cambridge Don. The third part covers the 200 months in Bombay, that is, until the year 1989 when the author moved to Pune. The fourth part describes the post- 1989 period in Pune, which includes the authors major achievement of creating a scientific institution of a unique kind. Known as IUCAA (Inter- University Centre for Astronomy and Astrophysics) this almost unique institution has already made a name internationally. The events, ambience, personalities that played significant roles in the authors life appear as the description unfolds. The author recalls his interactions with distinguished personalities like the philosopher S. Radhakrishnan, the writer E.M. Forster, scientists like Fred Hoyle, Paul Dirac, S. Chandrasekhar, politicians like Lal Bahadur Shastri, Indira Gandhi and Rajiv Gandhi, musicians like Narayanrao Vyas, aschitect Charles Correa etc. His time- span as described here covers the period 1938-2003, a period when there were significant changes in India on the political front, on the technology front and on the educational front. About the Author Jayant V. Narlikar (b.1938) is arguably one of Indias most celebrated scientists, and is well known for his work on cosmology and theoretical astrophysics. Although long known as a non- believer in the Big Bang model of the universe, his overall views on cosmology are taken seriously; so much so that he was once elected to the prestigious posi
Jayant Vishnu Narlikar was an Indian astrophysicist and emeritus professor at the Inter-University Centre for Astronomy and Astrophysics (IUCAA). His research was on alternative cosmology. Narlikar was also an author who wrote textbooks on cosmology, popular science books, and science fiction novels and short stories.
जयंत नारळीकरांचे आत्मवृत्त -“चार नगरांतले माझे विश्व”.
नारळीकर हे नाव शाळेत न ऐकलेला मराठी मुलगा किंवा मुलगी शोधूनही सापडणार नाही. विशेष करून विज्ञान शाखेकडे ओढा असणारी मुले. माझ्या शिक्षकांच्या, आईवडिलांच्या पिढीसमोरचा ते एक महत्वाचा आदर्श आहेत. या पिढीला त्यांच्याविषयी अपार आदर. आयुका, नेहरू तारांगण ही तर त्यांच्यासाठी तीर्थक्षेत्रेच. त्यांच्यातून आणि अर्थातच नारळीकरांच्या कामातून हा आदर पुढच्या पिढ्यांमध्ये उतरला. पुढे जाऊन काही काम करायचं असेल तर आपल्या विद्यार्थ्यांनी नारळीकरांसारखे भव्यदिव्य करावे अशी सगळ्याच शिक्षकांची कधी सुप्त तर कधी प्रगट इच्छा असे. विज्ञान-गणिताचे शिक्षकच नव्हे तर मराठी-संस्कृतचे शिक्षकही इथेच येऊन थांबायचे. हे असे का? नारळीकरांचा विज्ञान जगतावर, जगभरातील (मराठी) लोकांवर, पुढे मराठी साहित्यावर, शिक्षणावर कसा प्रभाव पडला या सगळ्या कधीतरी पडलेल्या पण न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकांत आणि ते वाचून केलेल्या चिंतनातून मला सविस्तर मिळाली.
नारळीकरांचे वडिल उच्च विद्याविभूषित होते. ते स्वतः रॅंग्लर होते. रॅंग्लर म्हटले की रॅंग्लर परांजपे हेच नाव आठवते. त्यांच्यांनंतर मराठी मुलुखातून केंब्रिजला जाऊन रॅंग्लर होणारे नारळीकर पिता-पुत्र. केंब्रिज वरून परत आल्यावर नारळीकरांच्या वडिलांना त्यांच्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे विभाग प्रमुख होण्याविषयी खुद्द विद्यापीठाचे संस्थापक मदन मोहन मालवीय यांनी आमंत्रण दिले होते. हे पद त्यांनी स्वीकारले आणि बनारसमध्ये त्यांचा संसार सुरू झाला.
जयंत नारळीकरांचे बालपण त्यामुळे बनारसला गेले. ‘बनारस’ हेच त्यांच्या आत्मवृत्तामधील पहिले महानगर. बनारस मधील बालपणीच्या वास्तव्यामुळे हिंदी भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. त्यांच्या आईकडून, मामाकडून त्यांना संस्कृत भाषेचीही गोडी लागली. समस्यापूर्ती, संस्कृत श्लोकांमधून घातलेली कोडी सोडवायची सवय त्यांना अशी लहानपणापासून लागली. त्यांच्या लेखांमधले संस्कृत भाषेच्या सढळ वापराचे उगमस्थान इथे होते. अनेक विद्वान, कलावंत, साहित्यिकांसाठी नारळीकरांचे बनारसमधले घर, परमुलुखात हक्काने रहायचे-जायचे ठिकाण होते. स्वतः रॅंग्लर परांजप्यांचा नारळीकरांशी घरोबा होता. जयंत नारळीकर लहान असताना त्यांना रॅंग्लर परांजप्यांच्या कडेवर देऊन त्यांच्या आईने अगदी हौसेने फोटो काढून घेतला होता.
महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत ते बनारसरला राहिले. पुढे वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या मिळवून उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्यांची ही सगळी पार्श्वभूमी वाचून, ते इंग्लंडला गेले नसते तरच मला जास्त नवल वाटले असते. त्यांचे वडिल तर केंब्रिज गाजवून आले होतेच पण त्यांचे मामाही तिथून पदवी घेऊन भारतात परतले होते. त्या सर्वांकडून त्यांना इत्यंभूत माहिती आणि मार्गदर्शन मिळाले. त्यांचा लहान भाऊही त्यांच्या मागे १-२ वर्षांत केंब्रिजलाच शिकायला आला.
‘केंब्रिज’ हे त्यांच्या जीवनातले दुसरे महानगर. उच्च शिक्षण आणि संशोधन असा १४-१५ वर्षांचा मोठा काळ नारळीकरांनी इथे व्यतीत केला. केंब्रिजमधील वास्तव्याबद्दल नारळीकरांनी सविस्तर, इतर नगरांपेक्षा थोडे जास्तच लिहीले आहे. याची दोन कारणे ते स्वतः देतात. पहिले कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना केंब्रजवरून नियमितपणे लिहीलेली आणि त्यांच्या आईने जपून ठेवलेली पत्रे. त्यामुळे सगळ्या आठवणी त्यांना संगतवार लिहीता आल्या. दुसरे कारण म्हणजे वाचकांनाही त्यांच्या याच देशाबाहेरच्या कामाबद्दल असणारी उत्सुकता. याविषयी या आधी त्यांनी केंब्रिजच्या वास्तव्याबद्दल सविस्तर लिहीलेले माझ्या पाहण्या-वाचण्यात नाही. पुढची भारतातील त्यांची कारकीर्द त्यामानाने लोकांसमोर घडली असे म्हणावे लागेल.
मला केंब्रिजविषयीची प्रकरणे वाचताना अजून एक कारण जाणवले ते म्हणजे स्मरणरंजन (नाॅस्टालजिया). त्यांच्या आयुष्यातली ही सर्वात महत्त्वाची वर्षे होती. इथेच ते अतिशय अवघड अशा ट्रायपाॅस परिक्षेत पहिल्या नंबराने पास होऊन रॅंग्लर झाले. ते शिकत असताना त्यांना अनेक हुशार आणि प्रतिभावान मित्र, शिक्षक, लेखक आदींचा सहवास मिळाला. हे कोण लोक होते? उदाहरण म्हणून एक फन फॅक्ट सांगतो- ‘स्टीफन हाॅकिंग‘ला नारळीकरांनी एकदा टेबलटेनिसच्या स्पर्धेत हरवले होते. केंब्रिजमध्येच त्यांनी आधी त्यांचा गाईड असणारा आणि नंतर मित्र झालेला फ्रेड हाॅयल याच्या सोबत विश्वाच्या उत्पत्ती बाबत मूलभूत संशोधन केले. स्थिर विश्वाचा म्हणजेच ‘स्टेडी स्टेट युनिवर्स’चा सिद्धांत मांडला. या त्यांच्या कर्तृत्वामुळे भारतात आणि जगभरात त्यांना मोठी लोकप्रियताही मिळाली. इथेच त्यांनी त्यांच्या पत्नी सोबत पहिल्यांदा संसार थाटला. त्यांच्या मुलींचे जन्मही इथलेच.
आधी मी म्हटल्याप्रमाणे नारळीकर हुशार होते, ते उच्चशिक्षणासाठी केंब्रिजला गेले यांत मला तरी फार नवल वाटत नाही. नवल वाटण्याच्या गोष्टीं पुढे आहेत. त्यांनी केलेले संशोधन, त्यामुळे मिळालेली अमाप लोकप्रियता, पुरस्कार हे सारे असूनही त्यांचे पाय जमिनीवरच राहिले. अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांकडून त्यांना संशोधनासाठी आमंत्रणे येत असतानाही त्यांनी केंब्रिज सोडून भारतात परत येऊन संशोधन करण्याचा मार्ग पत्करला.
मुंबई हे त्यांच्या आत्मवृत्तातले तिसरे महानगर. इथे त्यांनी पुढची १५-१६ वर्षे टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम केले. १९७३ साली ते परतले तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून मोठा काळ लोटला होता. ‘लायसन्स राज’ भारतात वाढीस लागण्याचा आणि स्थिरावण्याचा तो काळ होता. त्यामुळे घर मिळवणे, फोन जोडणी, गॅस जोडणी, शाळाप्रवेश अशा रोजच्या मूलभूत गरजांपासून ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील राजकारणापर्यंत, प्रत्येक गोष्टीत त्यांना अनेक अडथळे आले. यातले काही नारळीकरांची लोकप्रियता आणि वरपर्यंत ओळख यांमुळे दूर झाले. सर्व काही सोपे असेल अशी अपेक्षा नारळीकरांनीही बाळगली नव्हती. पण लालफितीच्या कारभाराशी लढण्यातच त्यांचा बराच वेळ गेला.
केंब्रिजमधल्या निकोप वातावरणला हे पूर्णपणे विरूद्ध होते. याचा त्यांच्या संशोधनावरही परिणाम झाला असणारच. नारळीकरांनी हे सारे अत्यंत संयमाने लिहीले आहे. व्यक्तीगत टीका त्यांनी शक्यतो टाळली आहे. जिथे शक्य नाही तिथे व्यक्ती बरोबर, त्याच्या कामाची पद्धत, परिस्थिती सगळे समजावून मगच टीका केली आहे. आजच्या काळात ही गोष्ट दुर्मिळच म्हणावी लागेल. सगळेच अनुभव नकारात्मक नाहीत. यातून घडलेल्या चांगल्या गोष्टी, इतर भारतीय संस्थांपेक्षा टाटाचे वेगळेपण वगैरे ते सविस्तर सांगतात. पण तरीही माझ्या मते, ते भारताबाहेर असते तर त्यांना संशोधनावर अजून जास्त लक्ष केंद्रीत करता आले असते. कदाचित स्थिर विश्वाचा सिद्धांतही आजच्या सारखा ‘बिग बॅंग’च्या लोकप्रियतेत मागे पडला नसता.
१५-१६ वर्षे असे काम केल्यावर मात्र त्यांना या कामाचा कंटाळा येऊ वागला आणि ते इतर प्रकल्प शोधू लागले. ‘नेहरू तारांगण’ विकसित करायची जबाबदारी त्यांना मिळाली. त्यांनी ती समर्थपणे पेलत एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण भारतात, मुंबईत बनवून दाखवले. यातूनच पुढे त्यांच्याकडे आयुकाचे काम चालत आले. सुरूवातीची १-२ वर्षे त्यांनी मुंबईमधून हा प्रकल्प चालवला. दिलेल्या वेळेत आणि पैशांत तो बसवला. आयुका पूर्ण झाल्यावर ते पूर्णवेळ पुण्यात स्थायिक झाले. ‘पुणे’ हेच त्यांच्या आत्मवृत्तातील चौथे महानगर.
आयुकाच्या स्थापनेत आणि वाढीत नारळीकरांचा सिंहाचा वाटा आहे. आज जरी आयुका पुण्याच्या महत्त्वाच्या ठिकाणात गणले जात असले तरी पुणे विद्यापीठ परिसरात जागा मिळवण्यासाठी नारळीकरांना विद्यापीठ प्रशासनाशी आणि शिक्षण विभागाशी बराच संघर्ष करावा लागला होता. शेवटी अथक प्रयत्नांमधून आयुकाच्या जागेचा प्रश्न सुटला. ‘चार्ल्स कोरीया‘ने केवळ नारळीकरांच्या ओळखीमुळे आयुकाची वास्तुरचना केली. १९८८ साली आयुकाचे उद्घाटन झाले. संशोधन कार्य त्याआधीच पाषाण रस्त्यावरील शेडवजा जागेत सुरू झाले होते. नारळीकरांनी आयुकाचे नेतृत्व केले आणि घडवलेही. वेळ आल्यावर त्यांनी आयुकाची धुरा नव्या पिढीकडे निर्धास्तपणे सोपवली. त्यामुळे नारळीकर नाहीत म्हणून आयुका थांबली असे झाले नाही. उलट नुकत्याच लागलेल्या गुरूत्वलहरींच्या शोधात आयुकाच्या शास्त्रज्ञांचा मोठा वाटा आहे.
आयुकाच्या माध्यमातून नारळीकरांनी संशोधनाबरोबर विज्ञानाच्या प्रचार-प्रसाराचेही काम केले. यासाठी त्यांनी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले. नारळीकरांनी मुलांसाठी सोप्या भाषेत विज्ञानकथा लिहील्या. यामुळे विज्ञानाबद्दल शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये गोडी, जिज्ञासा निर्माण झाली. पुढे येणाऱ्या जागतिकीकरणाच्या, उदारीकरणाच्या काळाला, २१व्या शतकाला सामोरे जाण्यासाठी आमच्या पिढीची मशागत या कामातून झाली.
नारळीकर जर भारताबाहेर राहिले असते तर ते कदाचित अजूनही मोठे झाले असते. त्यांना नोबेल आणि त्या जोरावर भारतरत्नही मिळाले असते. पण त्यांनी भारतात परत येवून काम करायचा निर्णय घेतला. आपल्या परदेशातील अनुभवाचा उपयोग त्यांनी भारतात विज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला. त्यासाठी सक्षम संस्थांची उभारणी केली. आपल्या पश्चात कामात खंड पडू नये म्हणून कुशल नेतृत्व उभे केले. मुंबई-पुण्याचे जगाच्या नकाशातले नाव अजून ठळक केले. त्यांचे हे काम कोणत्याही पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ आहे.
“चार नगरांतले माझे विश्व” २०१६च्या वाचन संकल्पातले हे सर्वोत्तम पुस्तक होते.
It is rare to see an autobiography of an Indian scientist. It's even more rare to see an autobiography of Indian scientist in Marathi. So, coming across चार नगरांतील माझे विश्व by Dr Jayant Naralikar was something special. Dr. Naralikar is well known for his Quasi-Steady State Theory, an alternative theory to Big Bang Model of the origin of the universe. In his autobiography, Dr. Naralikar narrates his life as a sequence of his living in four cities: His childhood and formative years in Benaras (Varanasi), doctoral and research years with Fred Hoyle at Cambridge, a professorship at Tata Institute of Fundamental Research in Mumbai, and as Founder- Director of IUCAA, Pune. The narrative is extremely detailed, running about 600 pages, and has a good collection of photographs, and a superb index. In fact, I read the book primarily using the index rather than the traditional start-to-finish approach. The book has received a Sahitya Academy award.