Jump to ratings and reviews
Rate this book

दुनियादारी [Duniyadari]

Rate this book
We are the largest dealer of Marathi Books and we deal with more than 500 publishers all around the India. We have product range more than 10000 and still counting. I am awaiting positive reply from your side.

272 pages, Hardcover

586 people are currently reading
8531 people want to read

About the author

Suhas Shirvalkar

197 books254 followers
Suhas Shirvalkar (Devnagari: सुहास शिरवळकर ) (15 November 1948 – 11 July 2003) was a Marathi writer from Maharashtra, India. Shirvalkar wrote Social Novels, Detective Stories, Short Stories, One Act Play, Newspaper Columns, Poems etc.

He authored more than 300 books including his well-known book "Duniyadari". Known for his detective-thrillers, he had also authored "Roopmati", a novel with a historical background, besides short stories, one-act plays. "Devaki", a Marathi movie based on one of his short-stories, won a State award for best story.

Duniyadari, a novel tracing the world of college-goers, was regarded a milestone in his writings.

The creator of characters like "Barrister Amar Vishwas [बॅ. अमर विश्वास], Firoz Irani [फिरोज ईराणी], Mandar Patwardhan [मंदार पटवर्धन] and Dara Buland [दारा बुलंद]" in his popular detective thrillers, he also managed to handle topics like medicine and astrology in great detail in his writings. His newspaper columns including "Ityadi-Ityadi, Vartulatim Mansa and Phalashruti" were well received by readers.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
943 (53%)
4 stars
467 (26%)
3 stars
196 (11%)
2 stars
69 (3%)
1 star
78 (4%)
Displaying 1 - 30 of 99 reviews
Profile Image for In.
158 reviews1 follower
August 24, 2013
बरेच दिवसांनी असा झपाटल्यासारख पुस्तक वाचून काढलं. सुहास शिरवळकरांचं दुनियादारी. मी अजून नुकताच आलेला मराठी चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे जे होतं, जसा होतं ते मला फक्त त्यांच्या लेखणीतून अनुभवता आलं. 'छोट्या पडद्यावरच्या निमित्ताने' ही छोटीशी प्रस्तावनेवजा कैफियत वाचून जरा जास्तच अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. आणि लेखकाच्या स्वतःच त्या पुस्तकाची स्तुती करण्याचा निरंतर प्रयत्न पाहून नक्की काय वाचायला मिळेल ह्याची एक शंका पण होती. पुस्तकाच्या शेवटी मात्र एक चांगली कथा वाचनात आली असा वाटलं खरं.

पुण्यातल्या SP कॉलेज मध्ये घडणारी ही कथा. तसं म्हणायला SP काय कुठल्याही महाविद्यालयात इथून तिथून दिसणारी. कॉलेज लाईफ आणि त्याउप्परही कट्टा म्हणजे काय हे कोणाला सहज कळून यावं अशी ही आहे. थोडासा शिवराळ, बाहेरून कडक पण आतून मऊ असा दिगंबर; मुंबईहून प्रथमच पुण्याला येउन कॉलेज चा अनुभव घेणारा श्रेयस. डोकेबाज करामती करणारा उमाकांत, मोकळ-ढाकळं वागणारी बोलणारी शिरीन, तितकीच आई वडिलांच्या धाकात असणारी सुरेखा आणि इतर अनेक. सगळे एकजात अवलिये, पण जीवाला जीव देणारे. कट्ट्यापासून सुरु होणारी ही कथा हळू हळू भावनिक होऊ लागते . महाविद्यालयाची पार्श्वभूमी न सोडता, थोडीशी युवावर्गाच्या अंतर्मनात डोकावू पहते. या १९८२ साली लिहिलेल्या कादंबरीला अजूनही मागणी आहे वाचक संख्या आहे ह्यावरून कादंबरीकाराला ते किती जमले आहे ते कळून जावे.

काही वर्षांपूर्वी चेतन भगत यांनी फाइव पोइण्ट समवन ह्या त्यांच्या पहिल्या कादंबरीतून IIT च्या आयुष्याला हात घातला. पुस्तक चिक्कार प्रसिध्द झालं. खोड्या करणाऱ्या मुलांमुळे त्याची आठवण झाली. त्या पुस्तकात आजच्या खोड्या करणारी मुलं असली तरी दुनियादारी पक्की पुण्याच्या गोष्टी सांगते. सुहास शिरवळकरांनी उभी केलेली मुलं अधिक जवळची वाटतात, आर्त वाटतात. मधेच कुठेतरी मग कॅम्पसचं कुंपण ओलांडून लेखक सत्य जीवनात उडी मारतो. प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून जग दाखवायचा प्रयत्न करतो. माझ्या मते ह्या कादंबरीचं यश हे त्यातल्या पात्रांच्या विविधतेला आहे . प्रत्येक वाचकाला ह्यातला कोणीतरी आपला वाटतो. नकळतच मन भूतकाळात घेऊन जातं.

माझं शिक्षण मुंबईला झालं. अगदी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत मी शामळू होतो. आपण बरे आणि आपलं काम बरं, काहीश्या अश्या विचारांचा. आमच्या बरोबर अनेक भाषांतली, प्रांतातली मुलं शिकायला होती. मुंबई सगळ्यांची आहे खरी. जितकी जवळ ही मुलं पुण्याच्या कॉलेज मध्ये आली तितकी मुंबईत आली असती का, असा राहून राहून प्रश्न पडतो. माझं आयुष्य तुलनेने अगदी सरळ गेलं. असे काही अनुभव गाठीला नाहीत. वाटतं कधी काही बेफाम होऊन करायला हवं होतं. पोक्त विचारांचं, तर्कसंगत कृतींचं ते वय नव्हतंच मुळी. असो, हे सगळे विचार मनात येत आहेत म्हणजे ह्या पुस्तकाने आपलं काम चोख केलं म्हणायचं.
Profile Image for Prity Malhotra.
140 reviews52 followers
August 23, 2013
Came to know abt this book after watching the movie Duniyadari based on this book..I watched dat movie almost 13 tyms..I assumed the book version wont be as Interesting as the movie version yet I bought the book..My 1st ever Marathi Kadambari..And the minute I started reading, I got soo drowned in this book that I kept reading at a strech of 14 hrs until I came to the last page..This Book is a Gem..Entertaining as Hell yet Touching as Well..While reading the Climax, I got scared for life..I hv read many horror novels yet I was never scared so much before..The writer takes you to a Tour of Life and Death..Amazing Read :-)
Profile Image for Mangesh Adgaonkar.
8 reviews1 follower
February 17, 2014
This book was published in early 80s, but even after more than 30 years you can easily relate to the college life described in this book. The slang and jokes might be slightly different now or when you were in college, but Suhas Shirvalkar has got the mood so perfect that you get transported to your own college life while reading this and start finding the parallels. It is a complex story with simple characters and the flow is so lively that you can keep it down until you reach the end.
I won't go into the synopsis because you might have seen the movie already (I haven't) or read it in other reviews here. This book has has many disconnected small stories or episodes that apparently seem to be interconnected only by timeline and the sequence in which they occur. Since there is no single central story, at some point after half-way mark, you would be wondering when is the 'actual story' going to start. It never does.. that is until the last few pages when all threads just come together. Classic!
I had mentioned in my earlier review of 'Nyay-Anyay' that he knows the art to surprise you - the original Marathi Jeffrey Archer! Its not a heavy read, but the theme will stay with you for much longer. Definitely recommended.
8 reviews11 followers
May 22, 2013
I have actually not enjoyed the college days as such....but after reading this book i came across such an experience which i think i missed.

Nevertheless this book takes me through a journey of the college life which was missed. Enjoyed it.
Profile Image for Akash Balwante.
104 reviews4 followers
February 10, 2021
दुनियादारी हे पुस्तक चित्रपटापेक्षा बरेच वेगळे आहे. जर एखादा विचार करत असेल कि मी चित्रपट पहिला तर वाचनासारखे काय असेल पुस्तकात, तर मला त्याला हे सांगावेसे वाटेल की चित्रपट आणि पुस्तकामध्ये जमीन अस्मान चा फरक आहे .
दुनियादारी हि गोष्ट आहे सत्तर च्या दशकातल्या श्रेयस ची जो मुंबईतून पुण्याला शिकायला येतो आणि त्याच्या कट्टा गॅंग ची . पुस्तकामध्ये प्रेमाचा त्रिकोणही आहे पण लेखकाने त्या त्रिकोणाला उपकथानक म्हणून ठेवले आहे. चित्रपट हा जास्त लव्ह स्टोरी होता तर पुस्तक हे कॉलेज लाईफ वर आणि त्यातल्या गमतीजमती वर आधारित आहे. पुस्तक हे श्रेयस आणि त्याचे पालक, मित्र, मैत्रिणी आणि त्याचे त्यांच्याबरोबर असलेले संबंध आणि या सर्वांबद्दल मनात असलेले त्याचे विचार या वर जास्त बोलते.
पुस्तकाचा शेवट सुद्धा चित्रपटापेक्षा वेगळा आहे आणि तो जास्त रियलिस्टिक वाटतो.
एकंदरीत पुस्तक हे चित्रपटापेक्षा खूप चांगले असून खास वाचावे असे आहे.

Profile Image for Abhijeet Dalvi.
2 reviews
August 30, 2013
One of the best book I have ever read in my life.
This book teaches you what life is all about
Profile Image for Jack.
6 reviews
November 11, 2022
4-5 वर्षा पूर्वी ह्या पुस्तकावरती असलेला दुनियादारी हा चित्रपट बघितलेला होता आणि पुस्तका मध्ये काय नवीन असेल असा विचार करून खूप वेळ मी दुलक्ष केलं. पण एक दिवशी असच आठवण आल्यावर मी हे पुस्तक वाचायला सुरुवात केली . पुस्तक हे 1975 चा आसपास लिहलेल आहे तरी पण सत्तर चा दशकतील कॉलेज जीवन आजही खूप रिलेटेबल वाटतं.
सुरुवातीला गंमत जंमत आणि मस्ती असलेली कहानी आर्ध्या पुस्तकातून गंभीर वळण घेते .
सु.शी. यांनी एम. के. श्रोत्री यांचे पात्र खूप सुंदर प्रकारे लिहलेले आहे , एम के यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या एकदा तरी विचार करायला लावतो. प्रेमभंग , एकटेपणा , मैत्री , धोका , अश्या नाजूक विषयांना ���ुस्तकात खूप चांगल्या प्रकारे हाताळण्यात आले आहे .
पुस्तकाचा शेवट हा काळजाला भिडणारा आहे आणि पुस्तक हे चित्रपटा पेक्षा खूप वेगळे आणि चांगले आहे . एकंदरीत जरी चित्रपट बघितलेला असेल तरी पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे .
Profile Image for Shinde.
Author 3 books107 followers
June 27, 2017
Poor little rich boy is desperate to 'fit in'. So he drinks, smokes, indulges in gang fights and random love affairs . His girlfriend too does all the above, since she's 'modern and progressive', you know? A few heartbreaks and deaths follow, by which time I had lost patience.
Oh, yes, the book was recently converted into a hit film. The trend of school/college romances with cuss words, awkward sex scenes and lusty voyeurism continues with great aplomb. Clearly, there must be an audience for it.
Profile Image for Apurva Nair.
32 reviews13 followers
November 12, 2020
कॉलेज मधल्या मुलामुलींची ही कथा, पण ती आपल्याला त्याही पलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडते. थोडक्यात सांगायचं तर श्रेयस नावाचा मुलगा मुंबईतून पुण्याच्या कॉलेज मध्ये शिकायला येतो. आई वडील असूनही जवळचे असे नाहीत, कोणी खास मित्र-मैत्रिणी नाहीत अशात कॉलेजमधल्या मवाली टाईप ग्रुप बरोबर त्याची ओळख होते. त्यांच्याबरोबर राहून आलेले अनुभव, 2 मुलींवर जडलेलं प्रेम, मित्राच्या प्रेयसीचं झालेलं मनाविरुद्ध लग्न, आईने सांगितलेली तिची शोकांतिका या अशा अनेक अनुभवांमध्ये घडत - बदलत गेलेलं श्रेयसचं आयुष्य, त्याचे विचार आणि अशा अनेक पात्रांबद्दलची ही कथा.

'एका गोष्टीला प्रत्येकाचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात / असू शकतात हे बऱ्याचदा विसरूनच आपण आपली मतं मांडत असतो आणि समोरच्याला चूक बरोबर ठरवून मोकळं होतो आणि शेवटी आपणच आपली मतं परिस्थितीनुसार बदलून टाकतो ' - माझ्यामते हे पुस्तक वाचून झालेलं सगळ्यात मोठं realisation. 'आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, पण तरीही त्यातून शिकत, उत्तरं मिळवत आयुष्य समाधानाने घालवावे का मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींबद्दल कुढत बसावे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते!'

या कथेतील पात्रं खरंच आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो, अनुभवत असतो. काही पात्रं आपण बघितली नसली तरी ती या समाजात नक्कीच असतात एवढं तरी आपल्याला माहित असतं. पुस्तक 1970-75 साली लिहिलेलं आहे, आता मध्यमवर्गीय घरात बरेच बदल झालेत, तरुण मुलामुलींच्या विचारांमध्येही बदल झालेत. सगळ्यांचंच कॉलेज life कथेनुसारच असेल असं नाही, पण अशी लोकं, घरं अजूनही नक्की आहेत. आणि याची थोडीतरी कल्पना असेल तर पुस्तक वाचायला सुरवात केल्यापासून संपेपर्यंत खाली ठेववत नाही. एकदातरी वाचावं असं हे पुस्तक!

(या पुस्तकावर काढलेला 'दुनियादारी' या चित्रपटापेक्षा पुस्तक जास्त प्रभावी आणि आपल्या जवळचं वाटतं.)
Profile Image for Manoj Nirgudkar.
Author 2 books
January 7, 2023
मुंबईत राहणारा श्रेयस कादंबरीचा हिरो आहे. त्याचे पुण्यातील कॉलेज जीवन, मित्र मैत्रिणी, कॉलेजमधील धमाल, माऱ्यामाऱ्या हा या कादंबरीचा गाभा आहे.

श्रेयस एकाचवेळी त्याच्या ग्रुपमध्ये असलेल्या मिनू आणि शिरीन या दोन मुलींमध्ये गुंतला असतो. मिनूला आणि शिरीनला पण श्रेयस आवडत असतो. प्रेमामध्ये शारीरिक आकर्षण असते. पण त्याच्याही पलीकडे श्रेयस त्यांच्यावर प्रेम करत असतो. हे फ्लर्टिंग नसते.

कॉलेज जीवन संपल्यावर प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या होतात. श्रेयस मुंबईला परत येतो. आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळायला लागतो. मुंबईतील एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलीशी त्याचे रीतसर लग्न होते. मिनूचे आणि शिरीनचे पण रीतसर लग्न होते. १९८० च्या सुमारास लिहीलेली कादंबरी आहे. तेव्हा इंटरनेट नव्हते. श्रेयसचा त्याच्या मित्रांशी थोडाफार संपर्क होता. हळूहळू सर्वजण आपापल्या व्यापात मग्न होत होते.

एकदा मिनू त्याला विमानतळावर भेटते. ती आता दोन मुलांची आई झाली असते. श्रेयसला भेटल्यावर तिचे जुने प्रेम उफाळून येते. ती श्रेयसला सांगते की आपण दोघे दूर कुठेतरी पळून जाऊया. एक क्षणभर श्रेयसला मोह होतो. पण श्रेयससमोर तिची दोन मुले येतात. आपण असे पळून गेलो तर ती मुले अनाथ होतील हे त्याला उमजते. तो कशीबशी तिची समजूत काढतो.

त्याच्या प्रेमाच्या ओढीमुळे शिरीन त्याला भेटायला मुंबईत येते. श्रेयसवरील प्रेमामध्ये ती तिच्या संसारात रमत नसते. श्रेयसचे तिच्यावर खरे प्रेम असते. तो तिची समजूत काढून तिला परत सासरी पाठवतो.

अशी ही वेगळ्या आणि खऱ्याखुऱ्या प्रेमाची गोष्ट आहे.
Profile Image for Reader Vivek.
234 reviews13 followers
August 19, 2021
दुनियादारी

बहुतेक आपण सगळ्यांनी दुनियादारी हा चित्रपट पाहिला आहे. मला चित्रपट जाम आवडला होता.

प्रस्तुत कादंबरीतील पात्र आपल्याला सहज आजुबाजूला दिसतात. एकुण पूर्णत्व जरी नसलं, तरी काही प्रसंग तर अनुभवलेले असतातच. आपण स्वतः सुद्धा कोणतंतरी पात्र अनुभवलेलच आहे.
पान क्र. १७२ वरील मज्जा तर मी कितीतरी वेळा अनुभवली आहे.

प्रस्तुत कादंबरीत लेखकाने एस पी कॉलेज मधील विद्यार्थांचे कॉलेजातील दिवस, त्यांची बनलेली कट्टा गॅंग चे वर्णन केले आहे. नंतर तिथून बाहेर निघाल्यावर पात्रांची खरी आयुष्याची कहाणी तर खुप काही शिकवुन जाते.
मैत्री, प्रेम, प्रेमत्रिकुट, खोड्या, मारामारी, टिंगल टवाळ्या, मैत्रीघात,प्रेमवेदना आणि असे कित्येक भावना, लेखक सुशी नी यात, अधोरेखीत केलेले आहेत.

शेवट वगळता पूर्ण पुस्तक हे सिनेमा सारखाच आहे. फरक एवढाच की आपण वाचताना जेवढं पुस्तकातील पात्रांसोबच अटॅच होतो, तेवढं सिनेमा पाहतांना नेहमी होतोच असं नाही.

मराठी वाचकांनी पुस्तक वाचा आणि अमराठी लोकांनी चित्रपट बघावा.

लेखक सुशि म्हणतात,
"दुनियादारी ही एक काल्पनिक पण सत्य अशी कथा आहे, आपल्या सर्वांमध्ये नित्य घडत असणारी. जोपर्यंत दोस्ती-यारी, दुष्मनी,आनंद-दुःख,प्रेम-मत्सर या भावना मानवी मनात दडल्या असतील, जोपर्यंत दोन पिढ्यांमध्ये मानसिक अंतर असेल, तोपर्यंत ही काल्पनिक, पण प्रातिनिधिक असलेली सत्यकथा अमर आहे."

आणि हे एकदम अचूक असं, त्रिवार सत्य आहे.

असं भरपूर पुस्तकां सोबत झाले आहे की ज्यांच्या वरील चित्रपट खूपच खराब बनवलेला आहे, पण या पुस्तकासोबत असं नाही. या कादंबरी वरील चित्रपट पण तेवढाच दर्जाचा आहे.

वाचाल तर वाचाल.
Profile Image for Avadhut.
8 reviews
September 26, 2012
Very interesting book.
It's about the incidents happening with you in real day today's duniyadari (Life).
While reading this book, you will definitely feel that some/atleast one incident has been happened with you in your Life.

Must read.
8 reviews
July 17, 2013
It's been (may be) around 10 years, I have read this book. I was quite impressed the book is written. It's about story of few close friends & their college days. Story was set in 1970's.

I would recommend this book to anyone. But if you're avid reader, you may find this book mediocre.
1 review
Read
September 6, 2012
it's all about college life of most people, as they live real life in clg day's....
1 review1 follower
Want to read
May 8, 2013
duniyadari
This entire review has been hidden because of spoilers.
1 review
July 29, 2013
I saw the movie and truly loved it and hence lokk forward to read it.
This entire review has been hidden because of spoilers.
Profile Image for Komal Thombare.
3 reviews15 followers
February 4, 2017
माणसाला आयुष्यात सगळं काहि मिळतं; फक्त मिळण्याची वेळ तेवढी चुकलेली असते.
-दुनियादारी
1 review
June 6, 2020
दुनियादारी ही कथा आहे 70च्या दशकातील. या कथेचा नायक आहे श्रेयश. तो कॉलेज मध्ये शिकण्यासाठी म्हणून स प महाविद्यालयात प्रवेश घेतो. तिथं त्याला भेटते दिग्या ची कंपनी.
दिगंबर पाटील उर्फ दिग्या हा कॉलेज मधला सर्वात टारगट पोरगा. सोबतीला काही अशीच दोस्त कंपनी घेऊन, येणाऱ्या जाणाऱ्या ची खेचत राहणं, राडा करणं, इत्यादी त्यांचे नित्य उद्योग. श्रेयस ची एका अपघातानंच या गॅंग ची ओळख होते. आणि श्रेयस देखील नकळत त्यांच्या पैकिच एक होऊन जातो. श्रेयस च्या आयुष्यात येते मिनू मकवना आणि शिरीन. श्रेयस ला शिरीन आणि मिनू दोन्ही मध्ये आपल्याला नेमकं कोण आवडत हे ठरवायला च अवघड जातं.
Profile Image for Shridhar Raut.
26 reviews
April 22, 2021
दुनयादारी... राग लोभ प्रेम मैत्री नाती हे सगळं त्यात समावल आहे आणि या सर्वावर्तीच आधारित हे पुस्तक आहे. पात्र नर्मिती जबरदस्त आहेत... सर्व पात्र अगदी डोळ्या पुढे हुबेहूब उभी राहतात.
शेवट खुपचं हृदयद्रावक आहे.
चित्रपट आणि पुस्तक यात खूप फरक आहे.
शेवटी लेखकाने सांगितल्या प्रमाणे ही एक काल्पनिक सत्य कथा आहे...
5 reviews
March 5, 2022
#मास्टरपीस
साधारणपणे BE चा third year ला हा चित्रपट आला होता
मी आणि माझा पूर्ण गॅंग क्लास बंक करून या movie ला गेलो होतो.
त्यामुळे ह्या कथेशी माझं वेगळं नात आहे
पहिला पहिला थोडं बोअरिंग वाटलं कारण मी चित्रपट पाहिला होता व बऱ्यापैकी पुढं काय होणार माहीत होत
पण लेखन इतका सुंदर आहे की शेवट पर्यँग खिळवून ठेवलं
फारच मस्त 🤟🤟👍
Displaying 1 - 30 of 99 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.