Jump to ratings and reviews
Rate this book

व्यासांचे शिल्प

Rate this book

268 pages, Paperback

First published January 1, 2002

3 people are currently reading
48 people want to read

About the author

Narhar Kurundkar

35 books50 followers
Narhar Kurundkar (Marathi: नरहर कुरुंदकर) was a well-known thinker and critic in Maharashtra. Through his books in Marathi and through various lectures related to such varying disciplines as history, politics, dramaturgy, literary criticism, aesthetics, fine arts, he contributed to the cause of education and culture in Maharashtra. He offered original and unbiased incisive analysis of manifold challenges and complexities of contemporary social, political and cultural environment.

During his life time with lectures, writings and encouragement to young writers and poets Prof. Kurundkar instilled confidence within people of Marathwada. He provided thought leadership to various social and cultural activities. School of Art, schools of music, research center for history, Marathwada Vikas Andolan are some of the examples. Prof. Kurundkar had become synonym for the Socio-cultural movement of Marathawada. His untimely death had created a void in socio-cultural arena.

प्रा. कुरुंदकरांच्या लिखाणाची औपचारिक सुरवात १९५३ साली प्रतिष्ठान या मराठवाडा साहित्य परिषदेच्या मुखपत्रात समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध होऊन झाली. त्यावेळी ते केवळ २१ वर्षाचे होते. त्यानंतर मराठवाडा दिवाळी अंकात शरदचंद्र चटर्जी यांच्या शेषप्रश्न या पुस्तकावर त्यांनी एक लेख लिहिला. पुढे नवभारत, सत्यकथा अशा प्रस्थापित मासिकांमध्ये विविध विषयावर लेख प्रकशित होऊ लागले.
रिचर्डसची कला मीमांसा हे पहिले पुस्तक १९६२ साली प्रकाशित झाले. देशमुख आणि कंपनी च्या रा. ज. देशमुख यांच्या आग्रहाखातर प्रा. कुरुंदकर यांनी एक २०० पानांचा समीक्षणात्मक लेखसंग्रह करून द्यायचे कबुल केले. तो पुढे रूपवेध या नावाने प्रसिद्ध झाला. या नंतरही प्रा. कुरुंदकर यांचे अनेक लेखसंग्रह प्रकाशित झाले. लेखसंग्रहाबद्दल एका पत्रात प्रा. कुरुंदकर लिहितात,
"लेख सुटे सुटे प्रकाशित होतात. त्या त्या वेळी पार्श्वभूमीसह संपूर्ण विषय मांडावा लागतो. अशा वेळी संग्रह केला की ग्रंथभर पुनरुक्ती होत राहते".
ही पुनरुक्ती टाळणे हे लेखकाचे कर्तव्य आहे असे ते मानत. मधल्या काळात झालेल्या अभ्यासाने मतांमध्ये ही बदल होतो.
"जे माझे मत चूक आहे, हे मला पटले व मी त्या मताचा त्याग केला", अशी त्यागलेली मते/ विचार लेख संग्रहात प्रकाशित करण्याची प्रा. कुरुंदकर यांची तयारी नव्हती. ग्रंथ रूपाने लेख संग्रह प्रकाशित करताना ते मोठ्या प्रमाणात फेर लिखाण करून, जेथे शक्य असेल तेथे पुनरुक्ती टाळून, चुका सुधारून घेत असत. आपल्या पुस्तकाबद्दल एका पत्रात ते लिहितात,
" माझ्या विवेचनाचे महत्व कदाचित कुणाला वाटणार नाही. माझी स्तुती होईल, विवेचनाची उपेक्षा होईल, मग माझ्या विवेचनाचे महत्व समजणारे वाचक निर्माण होईतो थांबणे भाग आहे."
ते पुढे लिहितात,
"पण, माझी इच्छा कठोर टीका होऊन सर्वांनी मला मुर्खात काढावे ही आहे. कारण त्यासाठी माझ्यापेक्षा खोलात उतरावे लागून मराठी समीक्षा अधिक सखोल करावी लागेल व तेच मला हवे आहे."

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
8 (72%)
4 stars
3 (27%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 of 1 review
Profile Image for In.
158 reviews1 follower
August 2, 2021
नरहर कुरुंदकर हे महाराष्ट्राला लाभलेल्या आधुनिक विचारवंतांपैकी एक आहेत. वस्तुनिष्ठ, परिणामकारक विचारांसाठी ज्यांच्याकडे पाहावं असं हे व्यक्तिमत्व आहे. आज जेंव्हा प्रत्येक लिखाण हे कुठल्यातरी हेतूने प्रेरित असल्याचे आरोप सर्रास होत असतात, तेंव्हा निव्वळ वैचारिक आणि अकादमीक हेतूने, चिकित्सक प्रेरणेने लिहिलेले त्यांचे सर्व लेख परत परत वाचनीय, मननीय ठरतात.

व्यासांचे शिल्प हा लेखसंग्रह आहे. पुण्याच्या इंद्राणी प्रकाशनाने ही आवृत्ती कुरुंदकरांचे बरेचसे लेख संकलित करून काढलेली आहे. इरावती कर्व्यांच्या युगांत किंवा दुर्गा भागवतांच्या व्यासपर्व सारखे सर्व लेख व्यक्तिकेंद्रित नाहीत. अखेरच्या एक दोन लेखांमध्ये या दोन्ही विदुषींच्या लेखनाबद्दलची कुरुंदकरांची मते विस्ताराने येतात. मात्र इतर लेख महाभारत ह्या ग्रंथराजाबद्दल आहेत. भांडारकर संस्थेने अतिशय विद्वत्तापूर्ण पद्धतीने, कष्टाने सिद्ध केलेल्या चिकित्सक प्रतीचेही संदर्भ ठिकठिकाणी येतात.

महाभारताबद्दल अनेक प्रभृतींनी सविस्तर लिखाण केले आहे. मुक्तेश्वर आणि मोरोपंत ह्यांच्या दीर्घकाव्यांपासून, टिळकांच्या गीतारहस्यापर्यंत अनेकांना ह्या ग्रंथाने भुरळ घातली आहे. कुरुंदकर ह्यातल्या अनेकांच्या अभ्यासपूर्ण लेखनावर आपली टिपणे देतात. अनेक ठिकाणी मूळ लेखकाची मते मान्य नसून त्या त्या लेखकांच्या परिश्रमाबद्धल आदरभाव व्यक्त करून ते त्यांचे मतभेद नोंदवतात. रामायणाबद्दल आणि गीतेबद्दलचे त्यांचे विचार परखड आहेत. प्रबंधांवरचे टीकात्मक लेख फारसे वाचनात येत नाहीत, मात्र या पुस्तकांतील लेखांमुळे बऱ्याच महाभारतावरील लिखाणाची ओळख होते. निव्वळ 'निवडितो ते सत्व आम्ही निके' ह्या शुद्ध हेतूने इतर लेखनाकडे आणि महाभारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे पुस्तक देते.

महाभारतातला सद्यस्थितीत एक धार्मिक रंग आलेला आहे. सर्वांत पुरातन महाकाव्य आणि इतिहास म्हणून महाभारताची ओळख आहेच पण त्यात आताशा प्रचंड सांस्कृतिक अभिमान कालावल्यामुळे, आणि त्यातील काही व्यक्तिरेखांना देवत्व बहाल झाल्याने, वस्तुनिष्ठ पद्धतीने, इतिहास म्हणून पाहताना अनेक अडचणी येतात. ह्या पुस्तकातले लेख अनेक अंशी ह्या अडचणी दूर करतात आणि महाभारताकडे इतिहास आणि कलाकृती अश्या दोन वेगळ्या परिप्रेक्षात पूर्णपणे भिन्न रीतीने पाहण्यात मदत करतात.

त्यांच्या लेखनशैलीविषयी नक्कीच एक वेगळा लेख लिहिता येईल. एखाद्या व्यक्तीच्या लिखाणाबद्दल लिहिताना, ती व्यक्ती आणि लिखाण ह्या दोन्हीचा संपूर्णपणे वेगळा विचार करण्याची क्षमता त्या पिढीतल्या अनेकांकडे होती. आज आजूबाजूला पाहताना, कोण कुठल्या 'कळपात' आहे ह्यावरून त्या व्यक्तीच्या मतांना सहजगत्या विलक्षण पूर्वग्रह लावले जातात. अश्या वेळी कुरुंदकरांचं लेखन प्रचंड समाधान देऊन जातं. कुठल्याही लिखाणावर आपलं मत देताना ते संपूर्णपणे लिखाणाबद्दलच कसं राहील ह्याचा वस्तुपाठ कुरुंदकरांच्या लेखणीतून जाणवतो. त्यांच्यापेक्षा वडील असलेल्या व्यक्तींच्या लिखाणाला त्यांनी आदरापोटी उगीच झुकतं माप दिलं नाही, मात्र लेखकाबद्दलचा आदर तितकाच सहजतेने व्यक्तही केला. अजिबात न पटणाऱ्या लेखकांशी पण कधीही पातळी सोडून टीका केल्याचे दिसत नाही. विचारांच्या लढाया ह्या विचारांनीच आणि पुराव्यांनीच लढल्या पाहिजेत, व्यक्तींत त्यामुळे वितुष्ट आले नाही हे त्यांचे आणि त्यांच्या समकालिनांचे यश.

प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि वारंवार वाचनात येत राहावं अशीच कुरुंदकरांची पुस्तके असतात, हे सुद्धा त्याला अपवाद नाही.
Displaying 1 of 1 review

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.