These ghosts can be found absolutely anywhere. Nobody can swear and say that they are not found in suchandsuch place. They are certain to be found haunting the ruins of old wadas, wells, and cemeteries. The Hadal lives in wells, and she moves about in the guise of a beautiful woman. The munja is sure to be found on a peepul tree. And of course the pimparni, banyan, and neem trees attract large groups of ghosts, just like monkeys. They are quiescent during daytime, and their day begins after dark. Then one can encounter them anywhere and in any guise. It is said that their feet face backwards; but this is not always true. On nomoon nights they definitely prowl about. To be seen by them, or even talking about them on such occasions is most dangerous!
Dattaram Maruti Mirasdar (Devanagari: दत्ताराम मारुती मिरासदार) (born 1927) is a Marathi writer and narrator principally of humorous stories. He hails from Pandharpur(Maharashtra).
Many of Mirasdar's humorous stories revolve around village life in Maharashtra. However, some of his stories concern the serious social issues and lives of the poor living in villages. His stories Gavat, Ranmanus, Kone Eke Kali, Bhavaki, Hubehub, and Sparsha belong to the latter class.
For some years, Shankar Patil, Vyankatesh Madgulkar, and Mirasdar jointly presented, in different towns in Maharashtra, highly popular public recitations of their short stories.
Mirasdar was a professor of Marathi in a college in Pune. He is currently the Acting President of Maharashtra Sahitya Parishad, Pune.
एकूण 11 विनोदी कथांचे हे पुस्तक. ग्रामीण आणि सहजसोपी भाषाशैली. व्यस्त आणि तणावपूर्ण दिवसातून 5-10 मिनिटं काढावीत आणि यातील एखादी गोष्ट वाचून थोडे relax व्हावे असे हे पुस्तक. यातील मला सगळ्यात जास्त आवडलेली कथा म्हणजे 'भुताचा जन्म'. द मा मिरासदारांनी केलेली माणसांची वर्णनं वाचताना ती माणसं डोळ्यासमोर हुबेहूब उभी राहतात. अधूनमधून काही हलकंफुलकं वाचावंसं वाटलं आणि ग्रामीण कथा आवडत असतील तर सगळ्यांना हे पुस्तक नक्कीच आवडेल. माझ्याकडून या पुस्तकाला 4*
One would expect, with such a title, that it might not be the usual genre of the author. If so, one may be puzzled or disappointed or neither, depending on how one interprets the first story that gives the title to the book. It could be completely funny, puzzling, or terrifying, depending on how you understand it. And therein the success of the maverick author.
And this remains true of most of the stories in this caleidoscope of a collection, except the last one. That one is pure laughter, all the way. ***
१. भुताचा जन्म
"– आणि तुकाराम लांडगेही नेहमी, गुंडगुळ्याच्या माळावर भुताशी आपण कशी कुस्ती केली, त्याचे फक्कड वर्णन सांगत असतो." ***
२. भवानीचा पक्षकार
" ... जुन्या वकिलांकडे माणसे मेंढरासारखी धावत होती. पण नानाकडे उंबरा ओलांडून कुणी शपथेला येत नव्हते. त्याच्या ओसरीची पायरी अक्षरश: एक काळे कुत्रेच एकदा चढले होते आणि ते पक्षकार होण्याच्या लायकीचे नसल्यामुळे नानाने हुडुत करून त्याला हाकलून दिले होते."
"“हे बघ गड्या, साक्षीदाराची उलटतपासणी घेण्यावर खटलं अवलंबून आहे. त्याच्या जबानीतल्या फटी हुडकाव्या लागतील.”
"“हुडका की फटी. दाबून हुडका.” नामदेव बोलला.
"“एकेकाची भंबेरी उडवावी लागेल.”
"“उडवा की – चांगलं आभाळात उडवा एकेकाला.”
"“जबान्या खोट्या पाडाव्या लागतील.”
"“पाडून टाका.”
"“कायदा फार वाचून दाखवावा लागेल.” नानाने ठोकून दिले.
"“फाडफाड वाचून दाखवा. माजं काय म्हननं न्हायी.”
"“मग त्या मानाने फी द्यायला पाहिजे.”
"हे ऐकल्यावर नामदेवाने कान ताठ केले. तो हसून म्हणाला, “हे असं काय बोलू नगा आं. फीचं कलम जरा बेतानं लावा.”
"पैशाच्या बाबतीत कुणीही झालं तरी चिकटच असतो, हे नानाला कळत होतं. म्हणून तो बेरकीपणाने म्हणाला, “त्यातल्या त्यात घेऊ बेतानं. पण काय देणार ते तर बोल. उक्तंच घेऊन टाकावं काम.”
"“उक्तच घ्या. म्हंजे मला बी किटकिट न्हायी. बरं, किती घेणार तुमी?”
"नानाने बराच वेळ विचार केला. आपली अब्रू न जाता कमीत कमी आपण किती घ्यायला पाहिजेत, याचा मनातल्या मनात हिशेब केला. शेवटी त्याने सांगितले, “उक्ते शंभर घेईन. जास्त काही सांगत नाही तुला.”
"शंभर रुपये हा आकडा ऐकल्यावर एखादा विंचू चावल्यावर माणूस जसा ओरडावा तसा नामदेव मोठ्यांदा ओरडला. इतक्या मोठ्यांदा की, नाना घाबरून एकदम मागे तक्क्यावर आदळला.
"“शंभर रुपयं?”
"“होय. का जास्त झाले काय?”
"“हॅट राव! तुमी तर एखाद्या फस्कलास वकिलाचाच दर सांगितला की!” हा उल्लेख पुन्हा नानाला झोंबला. पण पुन्हा राग गिळून तो म्हणाला, “मग किती रुपये द्यावेत, अशी इच्छा आहे तुझी?”
"“धा रुपये.”"
"“आता काय सांगावं तुम्हाला?.. साहेब म्हनला की, कुणीकडनं तरी एक वकील उभा कर माज्या म्होरं म्हंजे झालं. नवीन वकील आन म्हंजे लई गडबड करनार न्हायी त्यो. फुडचं माजं मी येवस्थेशीर करतो. येवढं समदं ठरलं आन् मंगच रुपये पाचशे दिलं म्यां साहेबाला!”" ***
३. भीमूच्या कोंबड्या
"भीमूने तेवढ्यात पिशवीतले जोंधळे काढून पुन्हा रस्त्यावर टाकले. त्याबरोबर इकडे-तिकडे फिरणाऱ्या कोंबड्या तुरुतुरु धावत आल्या. माना खाली घालून दाणे टिपू लागल्या.
"मग रस्त्यावर उभ्या राहिलेल्या सोमाला भीमू म्हणाला, “बाजूला हो – एका आंगाला. टुरिंग येतीय न्हवं का? धंद्याचा टाइम झाला. आज आनकी चार-दोन कोंबड्या तरी मेल्या पायजेत.”" ***
४. नदीकाठचा प्रकार
"वर्गणीची कल्पना काही वाईट नव्हती. माणशी चार-आठ आणं हा आकडाही तसा जड नव्हता. शिवाय तिथे उभे राहून बऱ्याच जणांना कंटाळाही आलेला होता आणि आपापल्या घरी महत्त्वाची कामे पडली आहेत, याचीही आठवण होऊ लागलेली होती. शिवाय नाही म्हटले तरी तसे थोडेसे त्या बाईच्या दुर्दैवाबद्दल वाईटही वाटत होते. त्यामुळे कुणी चार आणे दिले, कुणी आठ आणे दिले आणि दहा-पाच रुपये जमले. शिवाय काही आश्वासनेही मिळाली.
"आणि दुसरे कुणी बोलायच्या आत तो लगबगीने तिथून हाललादेखील. भराभरा पावले टाकीत तो गावाकडे गेला. तो इतक्या लगबगीने जाण्याचे कारण इतकेच होते की, त्याच्या घरातलेही सर्पण सरलेले होते आणि दोन दिवसांपासून बायकोने त्याचा तगादा लावलेला होता. इकडे आणता-आणता त्यातले अर्धा मण सर्पण घरी टाकता येईल, या हिशेबाने त्याने ते काम आपल्या अंगावर घेतलेले होते."
" ... त्याने नीट पाहिले होते. बाईच्या मनगटावर पाटल्यांच्या ठिकाणी, कानांच्या पाळ्यांजवळ वण उठलेले त्याला नीट दिसले होते. बाईच्या अंगावर जिनसा होत्या, हे नक्की. मग त्यांचे झाले तरी काय? त्या गेल्या कुठे? – –
"आणि मग त्याला एकदम शंका आली, त्या जिनसा अलीकडच्या गावातल्या लोकांनी काढून तर घेतल्या नसतील आदल्या दिवशी –?" ***
५. कंटाळा
" ... “मारत्याचं डोस्कं आगीनगाडीवानी पळतं; पण ह्यो बिरेक येऊन समदी घान झाली.”
"दुसरा म्हणत असे, “लई हयगय करतो कामाची. कुठलं काम येळेवर न्हायी करायचं.”
"“का? झोपायची टाइम येळंवर साधत न्हायी का?”
"“व्हय. तिवडं काम करतो येळंवर आं. त्यात काय हयगय न्हायी.”
"“काम करतो पन लई लेट करतो.”
"“गाडी ऐन पायंटावर आली की, हिकडं झोपला गडी!”" ***
६. पंचाक्षरी
"गावातल्या एखाद्या माणसाने एखादी बाई फुस लावून काढून नेली; अशी बातमी कुणी सांगितली की, तात्याचा चेहरा आश्चर्याने भरून जाई; तो विचारी, “काढून नेली?”
"आता तात्याने कायम विंचू पाळले आहेत. कुठेही भुताने झपाटल्याची ‘केस’ आली की, तो हे विंचू बरोबर घेऊन बाहेर पडतो. झपाटलेल्या माणसाच्या अंगावर विंचू सोडून देतो. विंचवांनी डंख मारले की, भूत थयथय नाचू लागते, ओरडू लागते. मग त्याचे विष उतरवून तो भुताला गचांडी देतो आणि समाधानाने घरी परत येतो.
"पंचाक्षरी व्हायचे त्याचे स्वप्न खरे झाले आहे.
"आणि आता त्याला कुणी ‘टिनपाट’ म्हणत नाही!" ***
७. आमच्या स्वयंपाकीणबार्इंचा नवरा
"मैनाबाईच्या नवऱ्याची ही स्वाभिमानी वृत्ती आणखीही अनेक वेळा दिसेल, अशी मला भीती वाटू लागली. मैनाबाईला येऊन आता चांगले तीन-चार महिने झाले होते. आई आता चांगली हिंडत-फिरत होती आणि सगळीकडे लक्षही देत होत���. त्यामुळे या बिचाऱ्या स्वयंपाकीणबाईचा आजार तिच्या ध्यानात आला तर तिची नोकरी जाईल, अशी धास्ती मला वाटत होती. पण आई जशी हिंडू-फिरु लागली तसे मैनाबाईचे दुखणे संपले आणि तिच्या नवऱ्याचा तापटपणाही एकदम नाहीसा झाला. एकूण तिचे नशीबच मोठे थोर!" ***
८. ऊब
" ... पण तो आरसा म्हणजे आरसाच होता. त्यात कसलेतरी प्रतिबिंब पडत असे हीच विशेष गोष्ट होती. हे प्रतिबिंब नेमके कोणाचे आहे, हे शोधून काढीपर्यंत बराच वेळ जात असे. तेवढ्यात गिऱ्हाइकाची हजामत आटोपून त्याच्या हातातला आरसा दुसऱ्या गिऱ्हाइकाच्या हातात गेलेलाही असे आणि या आरशाचे भिंग इतके चमत्कारिक होते की, अजूनही पहिल्याच गिऱ्हाइकाचे प्रतिबिंब त्यात न पुसता राहिलेले आहे, असे दुसऱ्या गिऱ्हाइकाला बराच वेळ वाटत असे. ... "
"पुढे कुणीही बाबूला काही तक्रारीची, भांडणाची गोष्ट सांगितली की, उशीसकट बूड उचलून आणि पुढे वाकून बाबू सांगू लागला, “हूं जाऊ द्या, च्या मायला वाद. काय? जात्याल पन्नास-साठ रुपये. गेले तर गेले.”" ***
९. सोळा आण्याचे वतनदार
"एकंदरीत असे चालले होते. अण्णासाहेबांच्या परभाऱ्या कुठलाही कारभार होत नव्हता. चार पैसे त्यांच्या खिशात पडत होते आणि सगळे लोक त्यांना चळचळा कापत होते. हा माणूस कुठे कुणावर बिलामत आणील, या भीतीने त्यांना मानीत होते. विरुद्ध जात नव्हते आणि वेळप्रसंगी त्यांची थोडीफार भर करीत होते." ***
१०. उपद्व्याप
"“बंड्या, वह्या, पुस्तके नीट बघून घाल दप्तरात. विसरु नकोस.”
"“अगं, तसंच करतोय मी.”
"“तसंच काय करतोयस! परवा पालकसभेत तुझ्या वर्गशिक्षिका तुझ्याबद्दल तक्रार करत होत्या. वर्गात पुस्तक आणत नाही, गृहपाठ कधी करतो, कधी करत नाही... ” आईचा पट्टा सुरु झाला.
"“अगं, त्यांना सवयच आहे तक्रार करायची. त्या नेहमी मला म्हणतात, ‘तू फार उपद्व्यापी मुलगा आहेस.”
"“मग काय खोटं आहे का? परवा म्हणे तू बेडूक नेला होतास खिशात घालून. अन् वर्गात सोडून दिलास –”
"“सोडून नाही दिला,” मी शक्य तितक्या नम्रपणे म्हणालो, “एकदम टुणकन उडी मारून खिशातून तोच बाहेर आला. मग काय, सगळ्या वर्गात पळापळ झाली.”
"“यालाच ‘उपद्व्याप’ म्हणतात बरं बाळ!”" ***
११. निरोप
"भोकरवाडी हे गाव फारच अद्भुत ठिकाणी वसलेले होते. मोठ्या सडकेवरनं आत चार कोस वाट तुडवली म्हणजे हे गाव लागत असे; पण ही चार कोसांची वाट फारच नामांकित होती. तिचे मुख्य वैशिष्ट्य हे होतं की, ती माणसाच्या साध्या डोळ्यांना अजिबात दिसत नसे. सरस्वती नदीच्या गुप्त प्रवाहाप्रमाणे हा रस्ताही गुप्त होता. सुरुवातीला तो ओढ्यानाल्याच्या सुकलेल्या प्रवाहाच्या रुपाने प्रकट होई. नंतर ही वाट एकदम जी भूमिगत होई, ती बराच काळ कोठेच दिसत नसे. अशा वेळी ती जमिनीवरील उभ्या पिकाखालून गेलेली असे. तिचा नंतरचा काही भाग केवळ काट्याकुट्यांचा होता. तोही ओलांडला म्हणजे मग अनेक लोकांचे मळेखळे, ताली, बांध अशी वळणे घेत-घेत, अखेरीस ती गावच्या शिवेला घेऊन दाखल होई. नशीब, या सबंध वाटेवर कुठे झाडेझुडपे नव्हती. नाहीतर मधेच, थोडीशी वाट झाडांच्या शेंड्यांवरूनही गेलेली आहे, असे नक्कीच कुणीतरी पटवून दिले असते.
"या सगळ्या गोष्टींमुळे नव्या माणसाला भोकरवाडीची वाट चुकूनही सापडत नसे किंवा सापडलीच तर मग ते गाव भोकरवाडी नसे. जांभूळवाडी किंवा बाभूळगाव असे. ही एरवीच्या दिवसांत दिवसाढवळ्या होणारी गोष्ट. मग पाऊसकाळ आला म्हणजे या गावाचा भूगोल किती उलथापालथा होत असेल, याचा नक्कीच अंदाज सांगणे कठीण."
"पावसाळ्यात भोकरवाडीला जाण्याचे पूर्वी काहीच कारण पडले नव्हते. त्यामुळे भोकरवाडीच्या रस्त्याला काय हिसका बसतो, हे कुणालाच माहीत नव्हते. पण गाड्या त्या अद्भुत रस्त्याला लागल्या मात्र, असे धडाधडा हिसके बसू लागले की, सगळ्यांची हाडे खिळखिळी झाली. वरंगळीत बसलेल्या गचक्यांनी थोबाडे फुटली. गाडीच्या साठ्यावर डोकी आपटून-आपटून सगळ्यांना टेंगळे आली. चिखल-राड तर इतकी उडाली की, सगळे अंगावरचे कपडे खराब होऊन गेले. बाई आणि पुरुष हा फरकही ओळखू येईनासा झाला. मध्येच दोनदा गाड्या मोडल्या आणि तीनदा पावसाची जोरात सर येऊन गेली."
"इनामदाराच्या घरी पोरगा जन्माला येऊन चार-पाच दिवस झाले होते. आजच त्याची पाचवी पुजली होती. आपण कधी, कुणाला बोलावले होते, हे आता तात्या इनामदाराच्या लक्षातही राहिलेले नव्हते. त्यामुळे आंबुजान आली आहे, हा निरोप ऐकून त्याला आश्चर्य वाटले आणि मग तो खूशही झाला."
"शेवटी डोळ्यांत पाणी आणून आंबुजान म्हणाली, “कुठून हिकडं आले आसं झालंय मला. कधी नव्हं ती सात वर्षांनी पोटुशी राहिली मी आन् ह्यो परसंग आला.”"
"– आणि चिलीम बाजूला ठेवून पळत आत आलेल्या महादाला उद्देशून तो लांबूनच ओरडून म्हणाला, “महादा, आत्ताच्या आत्ता तालुक्याला जा आणि एक बाई-डॉक्टर ताबडतोब घेऊन ये!”" ................................................................................................ ................................................................................................
Must read book in Marathi literature. Hilarious and highly entertaining short stories written with plots revolving around Maharashtrian village life. Flawless writing which brings to life rural characters (and associated traits).
Trust D M mirasdar to take up a serious issue of superstition and turn it into an interesting story to not just read but to thoroughly enjoy. Here is a 'Giggle ride' for you which ends on a note of a subtly presented serious issue of how superstitions are born.
I have always been a fan of his work and this one is no exception. I will not share the story and ruin it here. I would say just go ahead,read it and simply enjoy the simplicity of his narration style.