Jump to ratings and reviews
Rate this book

नाझी भस्मासुराचा उदयास्त

Rate this book
Rise and Fall of Nazism.

530 pages, Paperback

First published January 1, 1966

68 people are currently reading
1212 people want to read

About the author

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
232 (46%)
4 stars
178 (35%)
3 stars
67 (13%)
2 stars
14 (2%)
1 star
6 (1%)
Displaying 1 - 15 of 15 reviews
1 review
October 21, 2020
प्रथम भस्मासुराचा उद्यास्त ह्याचे लेखक वि. ग कानिटकर ह्यांचे कौतून करायला हवे. पुस्तकं वाचून पुस्तक लिहण्यासाठी केलेली मेहनत त्यामागील शोध खरंच कमालीची आहे. हिटलरच्या आयुष्यातील सुरवाती पासून ते शेवटपर्यंत व त्याही नंतरचा इतिहास आहे. पुस्तक वाचताना अंगावर काटा उभा राहील असे प्रसंग आहे.
दुसरे महायुध्द सुरू करण्याच्या हिटलर च्या हेतूची कीव येते. सर्व युरोप आर्यन वंशाच्या हुकुमाखाली याव ज्यू व स्लव्हा वंश. का? कारण काय तर त्याचा मते कीव इतिहास प्रसिद्ध ज्या लोकांबद्दल इतिहास प्रसिद्ध ज्या गोष्टी होत्या की ज्यू लोक जर्मनी लोकांमध्ये अन्नात जशी भेसळ असावी तशीच रक्तात भेसळ असल्या प्रमाणे आहेत ज्यू माणसे लालची प्रवृत्ती ची असतात व जर्मनी वर त्याची निष्ठा नसून बाहेर निष्ठा असते शहरातील वेश्यां व्यवसाय आणि गुलामांच्या व्यवसायात मुख्यतः ज्यू लोकांचं हात असे, हिटलर ने ज्यू लोकांना लहानपणी पासून अगदी जवळून बघितले होते व तेव्हा पासून त्याचे एकाच ध्येय होते की केवळ नवे राष्ट्र जर्मनी राष्ट्रवादाने व्यापलेले सुसंघटित, वैभवसंपन्न जर्मन नोको तर जर्मन सर्व जर्मन वंशाच्या लोकांचे एकतरी कारण हवे. व जे जर्मनी वंशाचे नाहीत ते जर्मन जीवनाशी एकरूप नाहीत. ज्यांना जर्मन राष्ट्राचे सोयरसुतक नाही ज्यांना जर्मनी स्त्रिया केवळ उपभोगत्याच्या बाहुल्या वाटतात अश्या लोकांना तो स्थान देण्यात तयार नव्हता. म्हणून काय संपूर्ण ज्यू वंशाला संपुष्टात आण्याचे? प्रत्येक धर्मात वाईट माणसे असतात म्हणून काय त्या साठी लहान मोठे म्हातारे ह्या सर्वांची निर्द्यातेने हत्या करायची? ह्याला वेडा नाहीतर काय म्हणणार? ह्यावरून हिटलर एक माथेफिरू वेडा देशभक्त होता इतकेच काय ते कळते. भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक लिहण्याचे कारण कानिटकरांनी सांगितले की.. आपण प्रतापगडावर जातो व राजांनी थाटात उभारलेली कबर पाहतो. अफजलखान शिवाजी राजांचा मारेकरी! माथेफिरू मूर्ख अशा शब्दात शिवाजी राजांनी हेटाळणी केली नाही परंतु अफजलखान नेमका काय होता? हे समजून घेतल्या खेरीज शिवाजी महाराजांचे मोठेपण कसे समजणार? राम समजायला रावण समजून घ्यावा लागतो मग कळते की रावण ह्याला संगीताचे वेड होते चांगले संगीत त्याला कळत होते, तो मोठा शिवभक्त होता. हा त्याचा गुण समजला तर त्याला मान्य करावेच की नाही? ज्याचे देणे त्याला दिले पाहिजे मग तो राम असो रावण असो अफजलखान असो वा हिटलर.
हिटलर ने कधी मद्य स्पर्श केले नव्हते कोणत्या ही बाई कडे त्याची वाकडी नजर नव्हती पैशाचे लालच त्याला नव्हते कोणाच्या हाताखाली काम करणे त्याला मंजूर नव्हते. एखाद्या परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या विविध शक्यता तो अचूक ओळखे इतिहास वाचन त्याचे भरपूर होते इतिहास वाचला तर देश वाचेल ही त्याची मान्यता होती हिटलर वर अन्य काहीही आरोप केले तरी त्याची देशभक्ती आणि शौर्य याबद्दल त्याचा शत्रूनाही आदर वाटेल एवढी त्याची देशभक्ती होती. वक्तृत्वाचा गुण त्याचा पशी होता तो फक्त मंत्रमुग्ध करणारा वक्ता नव्हता तर चतुर संघटक होता. "शब्द हे अज्ञात प्रदेशाकडे नेणारे पुल बांधतात" ह्यावरून शब्दाची किमया काय असते ह्यांची त्याला यथार्थ कल्पना होती. नाझी भस्मासुराचा उदयास्त इतिहास सांगण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे ह्या साठी की. ह्या पर्वात विलक्षण घटनाची ओळख सर्वानाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशयेवर कशी जाते? हुकुमशाही सत्ते वर कशी येते? राजकारणाचे यश नेहमीच डागाळलेले का असते? युद्धने प्रश्न सुटतात का? प्रखर देशभक्ती, सूत्रबद्ध संघटना, अमोध वकृत्व, देशाच्या राजकारणातील यशस्वी डावपेच, परराष्ट्र राजकारणातील पक्की मांड, हे सर्व ह्या हुकुमशाही पाशी होते तरी अखेर त्याचा पराभव का झाला? लढाई सुरू करण्याची चूक झाली? की रशियात हल्ला करण्याची? जिब्रालटन न घेण्यास चूक झाली का फ्रान्स ला दया दाखवण्यात? ह्या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्ासाठी ह्या इतिहासाची मदत होईल.
@bookpadhlo
This entire review has been hidden because of spoilers.
Profile Image for Anand Altekar.
5 reviews
August 29, 2017
This is one of the best books I've read on the history of WWII from a perspective that tells you what an Indian should learn from it. I wish there was an English translation so that I could recommend this to more of my friends.
Profile Image for Sagar Bhandare.
56 reviews6 followers
September 5, 2013
नमस्कार मित्रांनो,


मी बरीच पुस्तके वाचली आहेत. "नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही.
मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच. नसेल तर अवश्य वाचा.लोकशाही कशी सरणावर जाते आणि हिटलरसारखे हुकुमशहा सत्तेवर कसे येतात याचा हा थरारक इतिहास आहे.मी काही हिटलरची भलावण नाही करत. पण त्याच्या काही गुणांना आपण मानलेच पाहिजे.शिवाय आपल्याला जो दुसर्‍या महायुद्धाचा जो इतिहास उपलब्ध आहे तो बराचसा जेत्यांनी लिहीलेला आहे.ही इतिहासाची एक बाजू झाली. दुसरी बाजू आहे ती पहील्या महायुद्धात जर्मनीवर झालेल्या अत्याचारांची.कानिटकरांनी दुस-या महायुद्धाचा हा थरारक इतिहास लिहिताना याचे भान ठेवल्याचे जाणवते.

दुसर्‍या महायुद्धाचे बीज पहील्या महायुद्धातच पेरले गेले होते.अशा परिस्थितीत हिटलर जन्मास आला नसता तर नवलच होते.फारसा मोठा लष्करी पराभव न पत्करता जर्मनी पहिले महायुद्ध हरले होते.हे युद्ध प्रत्यक्ष जर्मनीच्या भूमीवर थोडेसेच लढले गेले होते.कैसर राजाच्या पलायनाने जर्मनीला पराभव पत्करावा लागला.जर्मन जनतेच्या हे लक्षातच येत नव्हते की आपण युद्ध जिंकत असताना कसे हारलो.

जर्मन जनतेच्या नेमक्या याच वेदनेवर हिटलरने त्याच्या जाहीर सभांमधून बोट ठेवले.जर्मनीला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्याचे भव्य स्वप्न हिटलरने जर्मन जनतेला दाखवले.जनता त्याच्या मागे हळूहळू जाऊ लागली.
हिटलर जेव्हा जर्मनीचा चेन्सेलर झाला तेव्हा त्याच्यापुढे किती प्रश्न होते ते पहा
- ६० लाख लोकांची बेकारी
- जर्मन मार्क ह्या चलनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील पत अगदी हास्यास्पद झाली होती(जर्मनीचे चलन एवढे पडले होते की एक भाजीची जुडी घेण्यासाठी पोतेभर पैसे घेउन जावे)१ डॉलर= ७,००,००० जर्मन मार्क्स
अवघ्या तीन वर्षात त्याने या प्रश्नांचा निकालदेखील लावला आणि जर्मनीला स्वयंपूर्ण देखील केले
- पहिल्या महायुद्धाची भरपाई म्हणून दोस्त राष्ट्रांना अब्जावधी रुपयांची खंडणी द्यायची होती
- जर्मनीला एका मर्यादेपेक्षा जास्त सैन्य उभारायची परवानगी नव्हती
असे शेकडो प्रश्न त्याच्यापुढे उभे होते
हे सर्व प्रश्न त्याने ज्या पद्धतीने सोडवले, ते पाहता माणूस आश्चर्यचकीतच होतो कधी नमते, तर कधी धमकी तर कधी शांततेची तान.या सर्वांच्या जोरावर हिटलरने जगातील महाशक्ती समजल्या जाणा-या बड्या नेत्यांना असे झुलवले की त्याच्या मुत्सद्देगिरीची दाद त्याचे शत्रूदेखील देतात. जगाच्या रंगमंचावरचा हा अक्षरश: एकपात्री प्रयोग होता.

हिटलर १९३३ साली सत्तेवर आला तेव्हा त्याला बहुमत नव्हतेच। तरी तो सत्तेवर आला.सत्तेवर येताच त्याने तीन वर्षात जर्मनीला एवढे बलशाली केले की जर्मनीत त्याची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती.फक्त ३८% मते असताना तीन वर्षानंतर घेतलेल्या सार्वमतात हिटलरला ९९.९९ % बहुमत होते, यावरुन हे लक्षात यावे
- बेरोजगारी नावालाही शिल्लक उरली नाही
- जर्मनीचे चलन आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिरावले
- व्हर्सायच्या तहाच्या चिंध्या केल्या व जाहीरपणे सांगितले की जर्मनी ही नुकसानभरपाई देण्यास बांधील नाही
- जर्मनीच्या सैन्याची आरमार विभागासकट पुनर्रचना केली
- युवकांना बलशाली करण्यावर कठोर मेहनत घेतली
(जेव्हा १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा शत्रूसैन्यापुढे जर्मन सैनिक एवढे बलशाली आणि ताकदवान दिसायचे की दोस्त राष्ट्राचे सैन्य जर्मनीला प्रतिकार करण्याच्या योग्यतेचे नव्हते आणि हिटलरला सहज चिरडू या भ्रमात राहण्यापेक्षा दोस्त राष्ट्रांनी सैन्य बांधणीस प्राधान्य द्यावयास होते असे हे बरेच इतिहासकार मान्य करतात)

हिटलरने रक्ताचा एक थेंबही न सांडता ३ भूभाग जर्मनीला जोडले.हे त्याच्या राजकीय ज्ञानाचे आणि आपल्या शत्रूंचे पाणी जोखण्याचे उत्तम उदाहरण आहे.दुसरे म्हणजे हिटलरची विलक्षण मानसिक शक्ती.त्याचे आडाखे इतके अचूक असत की त्याच्या पुढे त्याच्या सेनानींचा विरोध पूर्णपणे थंडावला.युरोपात जबरदस्त चढाई करुन १०-१५ दिवसांत एकेक देश जिंकून हिटलरने आपल्या शत्रूला जबरदस्त धडकी भरवली होती.हिटलरने रशियावर केलेली हिवाळ्यातील स्वारी त्याला खूप घातक ठरली.इतिहासकार हे खुल्या दिलाने मान्य करतात की हिटलरने रशियावर स्वारी केली नसती तर आज आपल्याला दुस-या महायुद्धाचा इतिहास वेगळाच दिसला असता.

अर्थात ज्यूंवरचे अत्याचार व गॅसचेंबर्समधील अमानवीपणा या पशूपेक्षाही हीन पातळीवरच्या योजनांनी हिटलरच्या आत लपलेल्या राक्षसाचेच दर्शन घडते. कदाचित दुसरे महायुद्ध जर्मनीने जिंकले असते तर भारत जर्मनीच्या गुलामगिरीत आला असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. विल्यम शिरर याने स्वतःच्या डोळ्यांनी हिटलरचा उदय आणि अस्त पाहिला त्यावर त्याने "राईज अ‍ॅन्ड फॉल ऑफ द थर्ड राईश" हे अप्रतिम पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पीडीएफ स्वरुपात येथून उतरवून घेता येईल.
http://www.gooshbe.de/upload/files/BO...

तर मित्रांनो, दुसर्‍या महायुद्धाचा हा अत्भुत इतिहास तुम्ही सर्वांनी अवश्य वाचा
तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल
Profile Image for Avenger.
24 reviews2 followers
March 3, 2017
This is an intriguing book based on the life of Hitler.

Hitler's childhood, his role in First World war, his entry into political realm, his Journey to become the Chancellor of Germany, World War 2 and his death is presented in this book.

The fact that the author has presented the conversations which happened during those times takes the book to new levels. And this is the most fascinating part of this book.

Must read if you want to know about the devil's rise and fall.
Profile Image for Shantanu.
14 reviews
December 13, 2015
One of the amazing books that I have read on the years of Nazi Germany. Gripping war descriptions, a view of world politics then, candid explanations of atrocities, and wonderful insights on the life of Adolf Hitler from his birth to being at helm, his strengths and weaknesses, and as the title says - the rise and fall of Nazi rule. A must read for a history lover.
Profile Image for Jeevan Dohifode.
1 review
October 18, 2015
Apratim....sagalyanne vachave ase book. Hitler var vachlele majhe pehle book.Yanantar Hitler var books vachane ani documentaries baghne ha veglach chhand jhala ahe. The most fascinating personality of the 20the century.
12 reviews
May 8, 2013
Awesome book. Author has also explained the better side of Hitler along with the weaknesses. He was true and great patriot. Book give very good idea about the political situations in 2nd world war.
Profile Image for Madhura.
46 reviews
March 18, 2014
An interesting read. As it is said, "History is written by survivors". This is the other side of the WW II story.
Displaying 1 - 15 of 15 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.