The story of a person who is lonely & tries to befriend with nature, however failed to maintain balance between his love towards nature, increases his aloofness.
G.N. Dandekar, (Devnagari: गो.नी. दांडेकर ) popoularly known as "Go.ni da" in marathi literature is one of the prominent writer of historical fictions & some real good biographical novels, Most of his books are also good travelogues including trekking data detailing almost minute information about the place & history associated with it.
He was honoured with a D.Litt degree by university of Pune.
अतिशय सुंदर व्यक्तिरेखा या कथेत चितारली आहे गोनीदांनी ...अगदी कुणीही तिच्या प्रेमात पडावं.
बुधा, हा एक म्हातारा मुंबईतून त्याच्या गावी म्हणजे किल्ले राजमाचीवर राहायला येतो. या माचीवर लोंकाची फारशी नाही फक्त चारदोन ठाकरांचीच काय तो घरं.... इथं तो या भयाण माळरानावर एकटा राहतो. त्याची शेती करतो आणि तीहि अगदी निसर्गाशी एकरूप होऊन. तो तिथल्या प्रत्येक गोष्टीला लळा लावतो, यात त्याने लावलेली आवळीबाई, उंबरबाबा, खारीचं कुठुम्ब, कुत्रा वगैरे. इअतकच काय अगदी रोज आकाशातून जाणाऱ्या विमानाचाही त्याला लळा लागला होता ... खूपच छान ...... !!!
● पुस्तक - माचीवरला बुधा ● लेखक – गो. नी. दांडेकर ● साहित्यप्रकार – कादंबरी ● पृष्ठसंख्या – ११२ ● प्रकाशक – मृण्मयी प्रकाशन ● आवृत्ती - १४वी । प्रथम आवृत्ती - १९५८ ● पुस्तक परिचय - विक्रम चौधरी ● मुल्यांकन – ⭐⭐⭐⭐⭐
राजमाची.. महाराष्ट्राचे कोकण महाद्वार.. शहरी जीवनाचा त्याग करून प्रत्येक ऋतूत कूस पालटणारया निसर्गसमृद्ध अश्या राजमाचीशी एकरूप होऊ पाहणाऱ्या बुधाची ही कहाणी.
बुधा.. उतारवयात आपल्या मुलाच्या कुटुंबासोबत,मुंबईत राहणारा एक अवलिया. अनेक वर्षे मुंबईत राहूनही आपल्या मुळांची ओढ असणारा. टेमलाई च्या पठाराशी, कड्याच्या पोटाशी, उंबराच्या शितळाईशी सलगी असणारा..
मुंबईच्या धकधकीतून जीवनातून बुधाचं मन हलकेच निसटायचं आणि माचीवर जाऊन भटकत राहायचं. शेवरीच्या कापसाच्या म्हाताऱ्या उडतात तसंच..
बुधाची ही कहाणी जणू काही मातीशी एकरूप होऊन जगणाऱ्या गो. नी. दांडेकरांचं प्रतिबिंबच..!!
गो. नी. दांडेकरांनी बुधा आणि त्याच्या भोवतालचा निसर्ग यांच्यातील संवाद या कादंबरीत रेखाटलेला आहे. निसर्ग जणू या कादंबरीतील एक पात्र आहे. बुधा माचीवर परत जातो आणि तिथून या संवादाची सुरुवात होते. माचीवर जाणाऱ्या पायवाटेच वर्णन लेखकाने इतक्या बाकाव्याने केले आहे की ते वाचून प्रत्यक्ष राजमाचीला भेट दयाविशी वाटावी. ते वर्णन अस..“दुतर्फा निगडी धुमारली होती. आवळी चवऱ्या ढाळीत होत्या.. रानजुई डोक्यात दहावीस पांढरीफेक फुलं खोवून तोऱ्यात उभी होती..रानजुई चा तसेच, कुंड्यांच्या फुलांचा वास अश्या अनेक सुवासांनी त्याच्या वयातील पन्नासपंचावन्न वर्ष पुसून टाकली..”
बुधा माचीवर पोहोचतो आणि लेखक त्याच्या जीवनाचे निवेदक होऊन त्याची कहाणी आपल्याला कथन करतात..
बुधाचा दिनक्रम सांगत असताना लेखकाने माणसाच्या निसर्गाशी असलेल्या तरल नात्याला न्याय देत त्याचे वर्णन केलेले आहे. प्राणिमात्राशी बुधाचं असलेलं नात, झाडांना आपलंसं मानून त्यांना उंबरबाबा, आवळीबाई असे नाव देणारा बुधाच्या स्वभावाच्या एक न अनेक छटा लेखकाने चितरल्या आहेत.. आधुनिकतेच्या हव्यासापोटी लोप पावत चालल्या निसर्गाला, भाषाशैलीला गोनिदांनी परत जिवंत केलेलं आहे. त्यांची ही लेखनशैली आपल्याला राहत्या खोलीतून अलगद हात धरून माचीवर कधी घेऊन जाते हे आपल्यालाही समजत नाही..
शहराच्या धाकधूकीत स्वतःच अस्तित्व हरवलेला बुधा जणू निसर्गातच त्याची “पाळंमुळं आणि स्वत्व” शोधत असतो. या कादंबरीत माणसाची निसर्गाशी एकरूप होण्याची ओढ आणि ते एकरूप होताना जाणवणारं एकाकीपण यांतला हाच संघर्ष लेखकाने खूप समर्थपणे रंगवला आहे.
खरंतर हे पुस्तक जेमतेम १०० पानांचं असलं तरी त्याचा आवाका हा खूप मोठा आहे. ही फक्त बुधाची कहाणी नसून प्रत्येकाच्या आयुष्यात येणारया एका स्थित्यंतराचं भाषांतर आहे. हे पुस्तक वाचताना अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या “ओल्ड मॅन अँड द सी” या पुस्तकाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. वैचारिक दृष्टिकोनातून पाहता हे पुस्तक मानवी नातेसंबंधांची गुंतागुंत, काळाचा ओघ आणि वयानुसार येणारी कालातीत प्रगल्भता यांची सुंदर गुंफण वाटते.
बुधाचे आणि पर्यायाने माणसाचे निसर्गाशी असणाऱ्या नात्यांचे अनेक पदर उलगडून दाखवताना छोट्या छोट्या गोष्टीतून नात्यांचे वैश्विक पैलूंचे दर्शन गोनीदांनी घडवलेले आहे.
लेखकाच्या वर्णनात्मक शैलीमुळे माचीचे एक मूर्त स्वरूप वाचकासमोर उभं राहतं तसेच गावातील दृश्ये, आवाज आणि गंधही पानांवर जिवंत होतात आणि वाचनाचा अनुभव द्विगुणित व समृद्ध करतात.
ही कादंबरी वाचकांना त्यांच्या स्वत: च्या जीवनावर चिंतन करण्यास प्रोत्साहित करते, वयानुसार येणारे शहाणपण आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यास प्रवृत्त करते.. आधुनिक गजबजलेल्या जीवनाच्या धावपळीत, कधीकधी संथ होऊन आपल्या मुळांशी परत जोडले जाणे आणि आपल्या ज्येष्ठांच्या कथा ऐकणे हे खूप मोलाचे आहे याचे मार्मिक स्मरण ही कादंबरी करून देते.
हे एक असे पुस्तक आहे जे आपल्याला कथाकथनाच्या सामर्थ्याची जाणीव करून देते आणि काळाच्या सीमा ओलांडून आपल्याला मानव असणे म्हणजे काय याचा अर्थ सांगते..
Excellent write up. The best part was it talks of all the challenges and joys that nature can bring when leaving away from socialized set up. It gives a neutral view and that part is written the best way. Wish it could be translated in English, I am sure readers of Mary Oliver would love it. Also cannot think of any better end. My words are unable to do justice to the fine writing it is. Why don't you just pick up and read instead?
बुधा नावाचा एक सामान्य पण तरीही एक ध्यास घेतलेला वनवासी आपल्या भोवतालच्या सृष्टीशी एकरूप होऊन तिच्यात कसा विलीन झाला- इतकी साधी अन् एकमार्गी अशी ही कहाणी नाही. या कहाणीत एक मोठा ताण आहे. एका बाजूला सृष्टीशी तदाकार होण्याची माणसाची अनिवार ओढ अन् दुसर्या बाजूला त्यामुळे निर्माण होणारा माणसाचा एकाकीपणा ह्यांमध्ये असा हा ताण आहे. आणि या ताणामुळे ह्या कादंबरीला एक विलक्षण वजन प्राप्त झाले आहे. ज्या एका आध्यात्मिक दृष्टिकोनाची म्हणा वा अनुभूतीची म्हणा, छाया सबंध कादंबरीभर पसरली आहे, ती म्हणजे माणूस आणि निसर्ग यांत कोणतेही आणि कसलेही वैर नाही, ही अद्वैताची भावना दाण्डेकर यांनी ‘माचीवरला बुधा’ या कादंबरीत सांगितली आहे.
उतारवयात मुंबईसारख्या शहरातून रानावनात जाऊन स्वतःची पाळंमुळं शोधणाऱ्या बुधाची ही गोष्ट. ज्या मातीत जन्म झालाय त्या मातीतच शेवट होयला हवा, एवढा साधा सोपा विचार त्याचा! पण असं हे निसर्गाशी एकरूप होऊन, स्वतःच्या कुटुंबाला सोडून दूर राहणं सोपं असतं का? बुधाला ते जमतं का? माणसाला माणसांमधे राहायची सवय, त्यात निसर्ग कधी सौंदर्याने नटलेला तर कधी रुद्र आणि तापट. माणूस न���सर्गाचाच एक भाग, पण म्हणजे नक्की काय?
जेमतेम शंभरएक पानांचं पुस्तक, पण अप्रतिम गोष्ट आणि अप्रतिम भाषाशैली. गो. नी. दांडेकरांनी प्रत्येक ऋतूनुसार होत जाणारे निसर्गातले बदल इतक्या छान शब्दात मांडले आहेत की निसर्ग आपल्याला नव्यानेच उमगतो. एवढं सगळं वैभव आजूबाजूला असताना आपल्या लक्षात कसं येत नाही बरं, हा प्रश्न आपल्याला हमखास पडतो. 'देवाने खूप खूप दिलं आहे, ते गोळा करता येतील असे हातच नाही आपल्याला' हे पुस्तकातील वाक्य खरंच पटतं पुस्तक वाचताना. प्रत्येकाने एकदातरी वाचावे असे हे पुस्तक!
महामारी मुळे घरी येण्याचा योग आला दहा वर्षानंतर. आणि बुधा जसा बऱ्याच वर्षांनी गावी येतो तसाच काही अनुभव पण आला. निसर्ग आणि मानवाचं नात हे उत्कृष्ट रित्या लेखकानी सांगितले आहे. अशी काहीतरी गोष्ट आहे जी फक्त माळ रानात आणि गावच्या वातावरणात आहे जी आपल्याला बांधून ठेवते ते ह्या पुस्तकात मांडल आहे. मोठ्या शहरात गावाकड राहणं आणि शांतता जर अनुभवायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.
The story of a person who loves nature & becomes aloof in society. The uncontrollable stress to maintain balance in both makes him commit suicide,the end is very touchy
“निसर्गाशी एकरूप झालं की माणसाला स्वतःचं खरं अस्तित्व उमगतं.”
माचीवरला बुधा ही गो. नी. दांडेकर यांची शांत, चिंतनशील आणि खोल परिणाम करणारी कादंबरी आहे. शहराच्या कोलाहलातून दूर जाऊन माचीच्या एकांतात राहणारा ‘बुधा’ निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःला नव्याने शोधतो. या प्रवासात बाह्य घटना कमी असल्या, तरी अंतर्मनातील घडामोडी अतिशय समृद्ध आहेत. डोंगर, वारा, पाऊस, झाडं—हे सारे घटक कथेत जिवंत होतात आणि बुधाच्या विचारविश्वाला आकार देतात. ही कादंबरी वेगवान कथानकाऐवजी अनुभूतीवर भर देते. साधेपणा, एकांत, आत्मचिंतन आणि निसर्गाशी असलेले नाते यांमधून जीवनाचा सूक्ष्म अर्थ उलगडत जातो. वाचकही हळूहळू त्या शांत वातावरणाचा भाग बनतो आणि मनात आपोआप चिंतन सुरू होतं.
निसर्गप्रेमी, विचारशील वाचक आणि संथ पण खोल अर्थ देणारे साहित्य आवडणाऱ्यांसाठी माचीवरला बुधा ही कादंबरी नक्कीच वाचावी. मनाला शांतता देणारी आणि आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करणारी ही एक अविस्मरणीय साहित्यकृती आहे.
निसर्गाचा सानिद्यात राहणारा " बुधा " अश्या एका अवलिया ह्याची कहाणी , उरलेले आयुष्य शहरा च्या गोंगाट पासून दूर राहून आपल्या बाप दाद्यानं ची जमीन कसून आयुष्य काढायचं ठरवतो.. माची वर आल्या नंतर हळू हळू इथलाच होऊन जातो.. ह्या कथे मधे (वारा , चिमनी, खार, पशु- पक्षी, विमान ) हे पात्र आहेत अस बोलो तरी वावगे ठरणार नाही.. पुस्तकं वाचताना आपण बुधा बरोबर निसर्ग शी एकरूप होत जातो... निसर्ग प्रेमी ना एकदम भावेल अस हे पुस्तकं
Most lovable thing of this book is budha's relation with the animals... Even when the buffalo hurts his leg he take care of her... It's a story about human and nature relationship, loneliness, animal love n most important budha's love for Western ghats...
This entire review has been hidden because of spoilers.
I found this book on Storytel.. Best thing is i heard this audio book at the time of morning walk & all things in book resonated with the environment & my thinking while walking on lonely road at early morning.. Must read for nature lover.. Everything in this book is best..
तर ही एका बुध्याची गोष्ट आहे. जो त्याच्या लेकासोबत म्हणजे 'भिव्या' सोबत भायखळा, मुंबई ला राहत असतो. आणि मग एक दिवस त्याला माची ची आठवण यायला लागते, तो अस्वस्थ व्हायला लागतो...ओढ खूप तीव्र असते आणि मग काय ! बुधा लोकल 🚂 ने निघतो लोणावळा आणि तिथून पायी माचीवर...❤️
माचीवर बुधा कुठे, कोणासोबत राहणार?माची त्याला इतक्या वर्षांनी जवळ करेल? तो तिथे काय करणार.. 🐕🐐🍃 त्यासाठी तुम्हाला माची वरला बुधा वाचायला लागेल..
"Machivarla Budha.
Machi - Rajmachi ⛰️ ..Written by Gondia. 🤌🏻
So, this is a story of a sage named 'Budha'. He lives with his son named 'Bhivya' in Bhaykhala, Mumbai. And then one day, he starts missing the Mountain (Machi). He becomes restless, the longing intensifies, and then what! The old man boards a local train 🚂 to Lonavala and from there, he heads towards the Machi... ❤️
Where is Budha going to meet Machi? After lots of years will Machi accept him? What will he do there on Machi? 🐕🐐🍃 For that, you will have to read Budha's story about Machi."