Jump to ratings and reviews
Rate this book

मोरपंखी सावल्या [Morpankhi Savlya]

Rate this book
We all know Ranjit Desai as a versatile writer He got his name and fame because of the novels, still he started his career as a writer with short stories. During the early years, he mainly focused on the rural life and the realities therein. Later on, he tried to walk on the path of history giving us wondrous stories with majestic environment. He sketched pictures of well known personalities in the field of music and art. Later on, he switched over to stories with more stress on nature, stars etc. Morpankhi Sawalya is a collection of 15 stories of different animals, used to the nature. The peculiarity of these stories is though they are written by a human not even a single human being comes into our sight throughout After going through the wonderful nature pictured by Ranjit Desai, we will once again realise his greatness. रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. कादंबरी-लेखनामुळे त्यांनी दिगंत किर्ती मिळवली असली, तरी त्यांनी साहित्यिक कर्तृत्वाचा आरंभ कथालेखनानंच केला होता. सुरवातीच्या काळात त्यांनी कथांच्या माध्यमातून ग्रामीण वास्तवाचा वेध घेतला. त्यानंतर इतिहासाच्या गर्भरेशमी, अद्भुतरम्य वातावरणात नेणाNया मनोवेधक कथाही त्यांनी लिहिल्या. संगीत-क्षेत्रात अलौकिक यश संपादन करणाNया काही कलावंतांची सुखदुःखही त्यांनी आस्थेवाईकपणे चितारली. पुढच्या काळात त्यांनी अत्यंत प्रवाही शैलीत काही निसर्गकथाही लिहिल्या, काही नक्षत्रकथाही लिì

96 pages, Kindle Edition

Published June 1, 2012

Loading...
Loading...

About the author

रणजित देसाई

44 books320 followers
Ranjit Desai

प्रसिद्ध कादंबरीकार , कथालेखक , नाटककार . रणजित देसाई मूळचे कोल्हापूरच्या कोवाडचे. इंग्रजी शाळेत असतानाच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. कोल्हापूरच्या ' महाद्वार ' मधून त्यांनी कथालेखन करायला सुरुवात केली.

इंटर नापास असलेल्या देसाई यांनी १९४७ मध्ये प्रसाद मासिकाने आयोजीत केलेल्या कथास्पर्धेत भैरव ही कथा सादर केली. त्यांच्या कथेला पारितोषिक मिळाले. या पारितोषिकामुळे त्यांच्या कथालेखनाला प्रोत्साहन मिळाले. रुपमहाल (१९५२) , कणंव (१९६०) , जाण (१९६२) , कातळ (१९६५) , गंधाली (१९७१) , कमोदिनी (१९७८) , आलेख (१९७९) , मधुमती (१९८२) , मोरपंखी सावल्या (१९८४) असे अनेक लोकप्रिय कथासंग्रह त्यांनी लिहिले.

सामाजिक आशयाच्या , ग्रामीण परिवेशातील त्यांच्या कथांमधून त्यांच्या लेखनाची खास वैशिष्ट्ये जाणवतात. खेडुतांच्या जीवनाचे चांगुलपणा मांडणा-या आकर्षक शैलीतील कथा त्यांनी लिहिल्या. बारी , माझा गाव , या प्रारंभीच्या कादंब-यांनंतर १९६२ मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावर त्यांनी स्वामी ही कादंबरी लिहिली.

या कादंबरीने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. त्यानंतरच्या श्रीमानयोगी या शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या कादंबरीने त्यांची कादंबरीकार म्हणून असलेली लोकप्रियता आधिकच वाढली.

ऐतिहासिक वातावरणाचे वैभव आणि व्यक्तीरेखांना दिलेली भावोत्कट उंची यांमुळे त्यांच्या ऐतिहासिक कादंब-यांनी लोकमानस जिंकले. स्वामीतील माधवराव आणि त्यांची पत्नी रमा तसेच श्रीमानयोगीतील शिवाजी आणि त्यांचे गुरु रामदासस्वामी यांच्या नात्यांना देसाई यांनी वेगळी परिमाणे दिली. लक्ष्यवेध (१९८०) , पावनखिंड (१९८०) , कर्णाच्या जीवनावरील राधेय (१९८६) , राजा रविवर्मा (१९८६) , अशा अनेक ऐतिहासिक पौराणिक कादंब-या लिहून देसाई यांनी या प्रकारच्या कादंब-यांचे युग स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण केले.

गरुडझेप (१९७३) , रामशास्त्री (१९८३) , स्वरसम्राट तानसेन , हे बंध रेशमाचे , कांचनमृग , धन अपुरे , वारसा , स्वामी , आदी नाटकेही त्यांनी लिहिली. नागीण , रंगल्या रात्री अशा , सवाल माझा ऐका या चित्रपटांचे पटकथालेखन , स्नेहधारा , मी एक प्रेक्षक असे लेखसंग्रहही त्यांनी लिहिले.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
9 (47%)
4 stars
4 (21%)
3 stars
1 (5%)
2 stars
1 (5%)
1 star
4 (21%)
Displaying 1 - 2 of 2 reviews
Profile Image for अनिकेत.
394 reviews23 followers
February 17, 2025
Stories of nature, jungle & animals. A small novella with short stories of jungle linked with each other. Language used & description of nature, change in seasons is just enchanting!
Profile Image for Abhijit Shaha.
8 reviews1 follower
April 11, 2020
रणजित देसाईंचे लेखन कौशल्य वादातीतच आहे. मोरपंखी सावल्या मध्ये त्यांच्यातील कथा लेखकाच्या सामर्थ्याचा प्रत्यय बऱ्याचदा येतो. पण.... वनकथा हा स्वतःचे वैशिष्ट्य असलेला लेखन प्रकार आहे. त्यात महिराथ मिळण्यासाठी त्या प्रकारचा, प्राणी जीवनाचा, जंगलाचा सखल अभ्यास आवश्यक आहे. मारुती चित्तमपल्ली किंवा व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा वाचल्या असतील तर त्यांचा हा अभ्यास आणि हातोटी वारंवार जाणवते. येथे मात्र देसाई त्यात कमी पडले असेल मला तरी वाटले. बऱ्याच कथा थोड्याश्या कृत्रिम, कपोलकल्पित वाटल्या.
Displaying 1 - 2 of 2 reviews