Jump to ratings and reviews
Rate this book

Raja Shivchattrapati #1

Raja ShivChatrapati Vol.1

Rate this book
...First Part of Biography of Shivaji Maharaj

Hardcover

Published November 1, 2015

40 people are currently reading
174 people want to read

About the author

Babasaheb Purandare

13 books71 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
79 (84%)
4 stars
8 (8%)
3 stars
2 (2%)
2 stars
3 (3%)
1 star
2 (2%)
Displaying 1 - 5 of 5 reviews
Profile Image for Reader Vivek.
233 reviews12 followers
February 24, 2022
राजा शिवछत्रपति

पुस्तकाचे नाव :- राजा शिवछत्रपति पूर्वार्ध
लेखक :- बाबासाहेब पुरंदरे
पाने :- ४८०
शैली :- ऐतिहासिक कादंबरी
प्रकाशन :- पुरंदरे प्रकाशन


प्रस्तुत पुस्तक हे शिवचरित्रावर आधारीत आहे, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. हे पुस्तक २ भागात लिहिल्या गेले आहे, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध.
त्यातील हा पुस्तकाचा पहिला भाग पूर्वार्ध.

ह्या भागात लेखकाने शिवजन्माच्या ३०० वर्षांपूर्वीच्या काळाचं थोडक्यात वर्णन केलं आहे. महाराष्ट्राची संत परंपरेच छान वर्णन ह्यात लेखकाने केलं आहे, जेव्हा महाराष्ट्र हे एक संपन्न आणि प्रफुल्लित राज्य होतं.

पण त्यानंतर अब्दाली च्या स्वारीने महाराष्ट्राची फार बिकट स्थिती केली आणि ती येत्या काही काळात आणखी दयनीय होत राहिली.

नंतर लेखकाने, शहाजी भोसलें बाबत पण भरपूर माहिती पुस्तकात दिलेली आहे. प्रथमतः त्यांनीच स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण ते त्यात अपुर्‍या सैन्यामुळे अपयशी झालेत. तरीही त्यांच्यात युद्धकौशल्य, जिद्द आदी गुण होते, तेच पुढे जाऊन शिवाजीराजांत आलेत.

तसेच जिजाबाईंची आपल्या लोकांसाठी काहितरी करण्याची जिद्द, लोकांना स्वातंत्र्य बहाल करण्याची ओढ, महाराजांत आली.

त्यानंतर, संपूर्ण काळोखात एक सूर्य किरण उगवतं आणि ते दिवसा दिवसाने वाढत जाऊन, महाराष्ट्राला लख्ख प्रकाशित करून जातं.

लेखकाने संपूर्ण पूर्वार्ध भागात, शिवपूर्वकाळ ते शाहिस्तेखानाला दिल्लीतुन पळवुन लावण्यापर्यंतचा काळ नमुद केला आहे. ज्यात अफजलखान वध, सिद्धी जोहर चा पराभव, सुरत शहराची लुट हे प्रकरण पण आहेत.

बाबासाहेबांचे लिखान मनास लगेच जुळतं, काही गोष्टी त्यांनी मिश्किल रित्या लिहिल्या आहेत. एकदम सोपं लिखान. अक्षरांचा Font पण मोठा आहे. वाचण्यास एकदम उपयुक्त पुस्तक.
नक्की वाचा.
Profile Image for Prajakta.
27 reviews4 followers
June 27, 2020
अतिशय रोचक व स्फूर्तिदायक शिवचरित्र. महाराजांच्या जन्मापूर्वी शतकानुशतके महाराष्ट्राची काय परिस्थिती होती, याची सविस्तर माहिती बाबासाहेब पुरंदरेंनी दिलेली आहे. जिजाऊ आणि महाराजांनी स्वराज्याचे जे स्वप्न पाहिले आणि साकारले ते किती मोलाचे व असामान्य आहे, हे त्या इतिहासामुळे अधोरेखित होते. सर्व प्रसंग खूप सविस्तर आणि सोप्या भाषेत आहेत. मी हे पूर्ण पुस्तक माझ्या चौहान वर्षांच्या मुलांना वाचून दाखवले. त्यांना ते समजलं व आवडलंही.
1 review
November 29, 2023
I can't read book please halp me😭😭
This entire review has been hidden because of spoilers.
Displaying 1 - 5 of 5 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.