पेशवाई हे पुस्तक कादंबरी आणि माहितीपर पुस्तक याचे उत्कृष्ठ मिश्रण आहे . या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकापासून दुसऱ्या बाजीरावच्या शनिवारवाड्यातून प्रयाण करेपर्यंत सर्व काही आहे . आपण या पुस्तकाला मराठा साम्राज्याच्या इतिहासाची संक्षिप्त आवृत्ती म्हणू शकतो . या मध्ये आपण सर्व मराठी राज्यकर्ते संभाजी महाराज , राजाराम महाराज , शाहू महाराज पासून ते सर्व पेशव्यांचा इतिहास वाचू शकतो. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य , संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी केलेला प्रतिकार , रायगड पडल्यावर राजारामने स्वराज्य वाचवण्यासाठी केलेले प्रयंत्न, शाहू महाराज कैदेतून सुटल्यावर बाळाजी विश्वनाथ नी नवनिर्माण केलेले स्वराज्य पासून इतर पेशव्यांनी मोठे केलेले मराठा साम्राज्य ते इंग्रजांविरुद्ध धुळीत गेलेलं साम्राज्य याचा पूर्ण आढावा घेतला आहे . एखाद्या मराठा राज्यकर्त्याबद्दल किंवा एखाद्या लढाईबद्दल तपशीलवार जाणून घ्यायचे असेल तर इतर पुस्तकही वाचू शकाल . मराठा साम्राज्याचे अधिकार छत्रपती पासून पेशव्यांकडे कसे हस्तांतरित झाले याचेही वर्णन यात केले आहे. यात लेखकाने सर्व मराठी राज्यकर्त्यांचे मुद्रा आणि स्वाक्षरी यांचे चित्र टाकले आहे . शेवटच्या प्रकरणामध्ये लेखकाने पेशवाईबद्दल गैरसमज दूर करण्याच्या नादात बरीच सावरासावर केल्याचा प्रयत्न दिसून येतो तरीही हे पुस्तक सर्व जणांनी वाचावे असे असून मराठा स्वराज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार या पुस्तकांमार्फत होता येते .
One of the good informative books on post Shivaji_Maharaj era of Marata empire. Kaustubh has taken very good efforts. It is not kind book where we can see long romantic description about Bajirao and Mastani. Book talks about wars, major political decisions and sometime thought process which leads to the decisions. If you are serious history lover and want overview of 118years of Peshwai in quick glance, this is rt book. Later one can jump in his specific interest zone.
थोडस रटाळवाने अन एकांगी !! चांगली माहिती भेटेल, पण लेखकाने कादंबरी लिहलेली नाहीये तरीही .... याला काय वाटले असेल, अस कल्पनाविश्व पण टाकलेले आहे. पेशवे चांगलेच होते !! पण एकांगीपणे लिहण्याच्या ओघात अनेक मराठी सरदारांवर(जे पेशव्यांच्या बाजूचे नवते, तरीही मराठेसहीचे अविभाज्य घटक होते... जसे आंग्रे, घोरपडे, दाभाडे) लेखकाने अन्याय / दुर्लक्ष केले असल्याचे पदोपदी जाणवते (अर्थात हे माझे मत)
If someone has already read "Punyache Peshwe" by A.R.Kulkarni, then this book just adds some more content to that. like the details of Panipat war, more information about Nana Fadnis, Mahadaji Shinde politics. The author seems to be confused about the writing style whether to be informative or to be novel styled. Gives a feeling of biased writing sometimes.