The first impression is - awe ! The amount (volume) of Satish Kalsekar's reading is indeed amazing! And, so at the same time, it is also very motivating and encouraging!! I loved reading this book, especially I found his "approaches" to the reading in general very remarkable. And, now switching-over to Marathi: "वाचणाऱ्याची रोजनिशी" हे सतीश काळसेकर लिखित पुस्तक वाचून सर्वप्रथम जाणीव झाली ती माझं स्वतःचं वाचन किती तोकडं आहे याची. एकंदरीतच वाचनव्यवहाराकडे बघण्याची दृष्टी किंवा त्याचे विविध पैलू यांची ओळख झाली असंही म्हणता येईल. एकूण हे पुस्तक वाचनीय आहे.
पुस्तकाचे नाव :- वाचणार्याची रोजनिशी लेखक :- सतिश काळसेकर शैली :- कादंबरी प्रकाशन :- लोकवाऽमयगृह पाने :- २९२ . पुस्तकाविषयीचं पुस्तक. पुस्तकाविषयी माहिती सांगणारं पुस्तक. वाचणार्याची रोजनिशी, हे पुस्तक पुस्तकाविषयीची पुस्तके ह्या प्रकारात मोडतं. जिथे आपल्याला, अधिकाधिक पुस्तकांची माहिती मिळते. तसेच त्या पुस्तकांची तपशिलवार माहिती मिळते. त्यामुळे असे पुस्तक एकदा वाचुन सोडुन देता येत नाहीत. तर अशी पुस्तकं कायमसाठी संग्रहित करुन ठेवावी लागतात.
प्रस्तुत पुस्तकाला/ पुस्तकासाठी लेखकाला, २०१३ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालाय.
काळसेकरांना लेखक आणि वाचकांमधील, दुवा म्हणायचे.
तर लेखक सतीश काळसेकर ह्यांनी अनेक पुस्तक, ग्रंथ वाचलेले आहेत, सोबतच त्यांनी अनेक ग्रंथ संग्रही करून ठेवलेले आहेत. तर अशा बर्याच वाचन केलेल्या पुस्तकांबाबत, नियतकालिका बाबत सोबतच, मासिक, त्रैमासिक, अनियतकालिके आणि दिवाळी अंकाबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. लेखक सांगतात ह्या वाचनरुपी आयुष्यात, त्यांना त्यांच्या मित्रांची खुप साथ मिळाली. मित्रांमुळेच ते एवढं वाचन करू शकले. पुस्तकात त्यांनी वारंवार अनेक मित्रांची नावे घेतली आहेत. त्यातील दोघं, जी माझ्या आवडीची आहेत, निखिलेश चित्रे आणि अच्युत गोडबोले. वाचन संदर्भातील, मनातील प्रत्येक विचार त्यांनी पुस्तकात मांडला आहे. मग तो लेखकाविषयी असो, प्रकाशकाविषयी असो, किंवा दिवाळी अंकांविषयी असो.
सोबतच त्यांनी, भारताच्या बाहेरील लेखकांविषयी, अनुवादित पुस्तकांविषयी, हिंदी कवि-लेखक, पुस्तकांविषयी, तसेच स्त्री साहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, पुरस्कार प्राप्त लेखकांविषयी बरीच माहिती सांगितली आहे.
त्यांनी सांगितलेल्या लेखक, पुस्तकाविषयी मी नोंदी करुन ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही पण हे पुस्तक वाचा, पुस्तकांच्या नोंदी करुन, ती पण पुस्तक वाचा.
I liked this book. Mr. Kalsekar writes about his many myriad efforts of keeping track of books he wishes to read, has read and inspires the reader while doing so. Many a times, I felt he mirrored my own zeal for reading. I made note of interesting books and poetry he has mentioned in the book. I particularly am in awe of his dedication and determination of building a house only for his books. Now that is something I wish to emulate. This is definitely a good read for readers looking for recommendations and for beginners as well.