Jump to ratings and reviews
Rate this book

स्वत:विषयी [Swatavishayi]

Rate this book
Amazing book written by Dr. Anil Awachat.

He mentioned his journey to become Dr. So what's so special about this book? He really don't want to be a doctor and his family was expecting to be a doctor.

But after he become a doctor he tell his parent that he will not join any hospital or work as doctor.


Highly recommended!

153 pages, Paperback

First published January 1, 1990

4 people are currently reading
113 people want to read

About the author

Anil Awachat

37 books48 followers
डॉ. अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार आहेत.

अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र राज्य व देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.

डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.

डॉ. अनिल अवचट हे स्वत: पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे.

डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी लिखाण केले आहे.

डॉ. अवचट यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या आहेत. नवीन पिढीलाही त्यांचे लेखन प्रेरणादायी वाटते यात शंका नाही.

डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही आहेत. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे,ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
34 (50%)
4 stars
21 (30%)
3 stars
11 (16%)
2 stars
0 (0%)
1 star
2 (2%)
Displaying 1 - 6 of 6 reviews
Profile Image for In.
158 reviews1 follower
March 27, 2022
अनिल अवचटांचं बाकी लिखाण वाचायच्या आधीच स्वतःविषयी वाचायला घेतलं. लिखाणाची हातोटी आहेच. फार विलक्षण नसलं तरी आयुष्य आहे ते आहे तसं मांडलेलं आहे.

हे संपूर्ण आत्मचरित्र नाही. जीवनातले काही टप्पे निवडून त्यावर विस्ताराने लिहिलेले हे लेख आहेत. बालपण, वैद्यकीय शिक्षणाचे दिवस आणि मग गृहस्थाश्रम असे हे टप्पे.

शेवटचा मुक्ता-यशोदेचे बाबा म्हणून आलेल्या अनुभवांचा लेख सुरेख जमून आलेला आहे.

त्यांच्या समाजवादी, चळवळीच्या किंवा शोधपत्रकारिता म्हणता येतील अश्या विषयांना वाहिलेली पुस्तके वाचायला हवीत असे आता वाटते. ज्या विषयांकडे पांढरपेशा समाजाचं मुद्दामून लक्ष जात नाही, तिथे ते नेण्याचं काम त्यानी केलं असं वाटतं.

त्यांची इतर पुस्तकं वाचून त्यांच्याविषयी आदर निर्माण झाल्यावर हे वाचायला घ्यावं असं माझं मत. कारण मुक्ता यशोदेला वाढवताना आणि सुनंदाबरोबरच्या संसारातल्या पुरोगामी कृती वगळल्या तर निव्वळ या पुस्तकातून फार हाती काही लागेल असे वाटत नाही. म्हणून आधी इतर लिखाण वाचून त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची ओढ निर्माण झाल्याशिवाय ह्या पुस्तकाला हात घालू नये.
Profile Image for Omkar Joshi.
11 reviews1 follower
August 20, 2019
डॉक्टर अनिल अवचट यांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या टप्प्यांवर भाष्य करणारं 'स्वतःविषयी' हे एक छोटेखानी आत्मकथन आहे. दहावीचं वर्ष, डॉक्टरी, मुक्काम नानापेठ, धार्मिक, संगोपन अश्या टप्प्यात या आत्मकथानाची विभागणी केलेली आहे. खरंतर हे पाच स्वतंत्र लेख आहेत. ज्याची सांगड घालून हे पुस्तक बनले आहे.

ओतूर सारख्या छोट्याश्या खेड्यातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात यायला मिळणार याचं अवचटांना विलक्षण कुतूहल आणि आकर्षण होतं. पुण्यात आल्यानंतर मॉडर्न हायस्कुलला त्यांनी प्रवेश घेतला. हॉस्टेलवर रहात असताना बाहेरून आलेल्या मुलांचं जे होतं तेच अवचटांच झालं, हॉस्टेलवर राहून पूर्ण बिघडले. एवढे की त्यांना हॉस्टेलमधून एकदा काढून टाकण्यात आलं. दहावीचं वर्ष या लेखात त्यांनी तत्कालीन पुणं, ओतूरहून पुण्यात आल्यानंतर स्वतःत झालेले बदल, हॉस्टेलच्या मेसचं जेवण, अशा विविध विषयांना हात घातला आहे.

डॉक्टरी हा लेख फारच भावला. या लेखात, मेडिकल कॉलेज जीवनातले सर्व बारकावे फार खुबीने मांडले आहेत. पहिल्यांदा डिसेक्शन करतानाचा अनुभव, डॉक्टरांचे, शिक्षकांचे स्वभाव, मित्र, मैत्रिणी, इंटर्नशिप करताना आलेले हॉस्पिटलचे, पेशंटचे अनुभव हे सगळं यात आहे. मेडिकलला असतानाच कुमार सप्तर्षी सारखा मित्र त्यांना मिळाला. दोघांनी मिळून सामाजिक कार्य करण्यासाठी मंडळ स्थापन केलं. पुण्याच्या आसपासच्या खेडेगावात जाऊन मोफत दवाखाना चालवला. बिहारमध्ये जाऊन तेथील गरिबी पाहून अवचट अस्वस्थ झाले. तिथेही दवाखाना चालवला. कॉलेजच्या सहली अरेंज केल्या, त्यात मुलीदेखील भाग घेऊ लागल्या. अशाच एका सहलीत त्यांना त्यांची सहचारिणी सापडली, सुनंदा. पुढे इंटर्नशीपला असताना आलेल्या अनुभवातून अवचटांचं मन डॉक्टरीतून पूर्ण उठलं, घरच्यांच्या आग्रहाखातर त्यांनी डॉक्टरी पूर्ण केली पण ती फारशी चालवली नाही.

डॉक्टरी पूर्ण केलेले अवचट पुढे प्रॅक्टिस करणार नाही हे घरी कळल्यावर घरच्यांशी त्यांचे मतभेद झाले. त्यातच घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी सुनंदाशी विवाह केला होता त्यामुळे संबंध अजूनच विकोपाला गेले व अश्याच एका भांडणानंतर अनिल अवचट आणि त्यांची पत्नी सुनंदा यांनी आपलं घर सोडलं. नंतर एक महिना मित्राच्या खोलीवर काढलं, पण असं किती दिवस चालणार. त्यामुळे बाबा आढाव यांच्या ओळखीने नाना पेठेत जुन्या चाळीतल्या एका छोट्या खोलीत अवचटांचं बिऱ्हाड हललं. नाना पेठेतल्या त्या जुन्या चाळीत आलेले विलक्षण अनुभव 'मुक्काम नानापेठ' या लेखात वाचायला मिळतात.

अनिल अवचटांची धार्मिक बाजूही आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. ओतूरला असताना कपर्दिकेश्वराची जत्रा त्यांनी अनुभवलेली होती, घरी असणारं श्रद्धाळू वातावरण अनिल अवचटांना धार्मिक बनवलं. घरात कीर्तनाची परंपरा होती. अनेक बुवा कीर्तनाकरिता अवचटांच्या घरी मुक्काम ठोकत आणि वाड्याच्या ओसरीवर महिना महिना कीर्तने चालत. वडील देखील गावात कोणी कीर्तनकार आले तर त्यांना सरळ घरी घेऊन येत. अवचटांचे वडील गावातले एकमेव डॉक्टर होते, नंतर नंतर गावात जशी डॉक्टरांची संख्या वाढत गेली तशी वडिलांची प्रॅक्टिस कमी होऊ लागली त्यामुळे कीर्तनाचा खर्च परवडत नसे तरी देखील अनेक कीर्तनकार आशेने अवचटांच्या घरी येत. सुरुवातीला वडील कटकट करीत पण नंतर स्वतःहूनच कीर्तनकार बुवांना राहायचा आग्रह करीत. नंतर अनिल अवचट एका बुवांच्या संपर्कात आले. इतके की ते त्या बुवांच्या भजनी मंडळात सामील झाले. पण पुढे बुवांच्या ढोंगी विचारांचा अनुभव आला आणि अनिल अवचट संपूर्णपणे बदलून गेले. आता ते देव मानत नव्हते पण त्यांनी इतरांच्या श्रद्धेचा कधीही अपमान केला नाही. उलट गावाची जत्रा बघायला ते त्यांच्या दोन्ही मुलींना घेऊन जात असत.

या पुस्तकातील शेवटचा लेख म्हणजे 'संगोपन'. आजच्या काळातल्या सर्व आई वडिलांनी (व होऊ घातलेल्या आई वडिलांनी) हा लेख वाचायलाच पाहिजे असा आहे ! मुक्ता व यशोदा या दोन मुलींचं संगोपन कसं केलं हे फार सुंदर मांडलंय. ऐपत असतानाही मुलींना कॉर्पोरेशनच्या शाळेत घातलेले आई वडील मी पहिल्यांदाच पाहिले. मुलींचे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच व्हावे हा अनिल आणि सुनंदा दोघांचाही हट्ट होता. टेक्नॉलॉजीच्या या काळात आपल्या पाल्यांचं संगोपन कसं करावं याचा सुंदर वस्तुपाठ ह्या लेखात घालून दिलेला आहे. अगदी मुलींना मोकळेपणाने खेळता यावं म्हणून त्या पद्धतीने घर देखील अवचट कुटुंबीयांनी बांधलं. ह्या लेखविषयी फार काही लिहिण्यापेक्षा हा वाचाच असं सांगेन.

एकूणच हे पुस्तक फारच आवडलं. कुठेही फाफट पसारा नसलेलं, अत्यंत साधी मांडणी आणि अफाट व्यक्तिमत्त्व. पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेपासूनच अवचट काळजाला हात घालतात. सुनंदाला अर्पण केलेली ही छोटीशी अर्पणपत्रिका. इथूनच वाचक या पुस्तकात जे रमून जातो तो शेवटपर्यंत !
Profile Image for Aniket Patil.
525 reviews22 followers
October 28, 2017
Fantastic piece of writing. This man is brilliant. I am flabbergasted by reading this book. Ease of writing, Childhood ,school experience/hostel felt like Milind Bokil's Shala. Very absorbing. everything written in this book is quality stuff and entertaining as well. I would love to read all his books. this one is my second book . this according to me is a Definite read.
1 review
July 8, 2023
This writer in amazing brilliant short of words. Simply great, inspiring..... What a life he lived
... Hats off awchat sir.... Take a bow !!!!.... Currently reading this book....
Profile Image for Adhir Pandit.
14 reviews2 followers
May 31, 2012
Amazing book written by Dr. Anil Awachat.

He mentioned his journey to become Dr. So what's so special about this book? He really don't want to be a doctor and his family was expecting to be a doctor.

But after he become a doctor he tell his parent that he will not join any hospital or work as doctor.


Highly recommended!
Displaying 1 - 6 of 6 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.