Jump to ratings and reviews

Donald Trump

डोनाल्ड ट्रम्प हा अमेरिकेचा ५४ वा राष्ट्रपती व्हावा यासारखी धक्कादायक घटना या शतकात अपवादानंच घडली असेल, अत्यंत अनपेक्षितरीत्या भल्याभल्यांचे अंदाज धुळीला मिळवून ट्रम्पनं हिलरी क्लिंटनचा पराभव करत जगातल्या सगळ्यात शक्तिशाली पदावर कब्जा केला. ट्रम्पला 'विदूषक' म्हणून हसण्यावारी नेणारे असंख्य लोक अक्षरशः अवाक झाले. कोण आहे हा डोनाल्ड ट्रम्प? तो इतका वादग्रस्त का आहे? सातत्यानं त्याच्याविषयी माध्यमामध्ये चित्रविचित्र बातम्या का छापून येतात? राष्ट्रपती झाल्यावरही त्याच्या वागण्याबोलण्यात पोक्तपणा, आपल्यावरच्या जबाबदारीची जाण यातलं काहीच का आढळत नाही? मुळात तो राष्ट्रपती झालाच कसा? राजकारणाचा गंधही नसताना आणि अत्यंत निषेधार्ह पार्शवभूमी लाभूनही तो इथंवर पोहोचलाच कसा? अमेरिकेला आणि त्यामुळे जगालाही पडलेल्या या महाभयानक स्वप्नाची हि खिळवून ठेवणारी

182 pages, Paperback

Published August 1, 2018

Loading...
Loading...

About the author

Atul Kahate

75 books26 followers
अतुल कहाते

Ratings & Reviews

What do you think?

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
1 (14%)
4 stars
2 (28%)
3 stars
3 (42%)
2 stars
1 (14%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 1 of 1 review
Profile Image for Apurva Nair.
32 reviews13 followers
July 24, 2020
लेखकाच्याच भाषेत सांगायचं तर, हे पुस्तक म्हणजे 'डोनाल्ड ट्रम्प सारखा खोटारडा, स्वार्थी, बेभरवशी माणूस जगातल्या सगळ्यात महत्वाच्या आणि ताकदीच्या पदावर कसा जाऊन पोहोचला हे समजून घेण्यासाठी केलेल्या वाचनाचं सार'

डोनाल्ड ट्रम्पची पार्श्वभूमी, बालपण, त्याचा व्यवसाय, लग्नं, reality shows, राष्ट्रपतिपदासाठीचे प्रयत्न आणि त्यात त्याला मिळालेलं यश या सर्व गोष्टींबद्दलची थोडक्यातली माहिती या पुस्तकात दिलेली आहे. अमेरिकन भांडवलशाही आणि टोकाच्या चंगळवादातून तयार झालेलं ट्रम्पचं व्यक्तिमत्व लेखकाने व्यवस्थित मांडले आहे. पुस्तक कुठेही कंटाळवाणं होत नाही. ट्रम्पने मारलेल्या मोठमोठ्या थापा, किंवा व्यवसायात यशस्वी होण्यासाठी केलेल्या उचापती वाचताना आश्चर्य वाटते (पण नंतर करमणूकही होते - सुरस आणि चमत्कारिक कथांसारखे, ज्यावर विश्वास ठेवणे अवघड जाते!). त्याच्या अमेरिकेबाहेरील व्यवसायाबद्दल जास्त काही माहिती मिळत नाही. पुस्तकाच्या शेवटचे काही भाग त्याची राष्ट्रपतिपदासाठीची तयारी आणि नंतरचा कारभार (पुस्तक 2018 चे आहे) यावर आधारित आहेत पण यासाठी ट्रम्पने घेतलेली फेसबुक / रशियाची मदत यावर लेखक काहीच प्रकाश टाकत नाही.

एकूणच ट्रम्प बद्दल थोडक्यात माहिती करून घ्यायची असेल तर हे पुस्तक नक्कीच आवडेल. माझ्याकडून या पुस्तकाला 3.5 स्टार्स
Displaying 1 - 1 of 1 review