ब्र’ उच्चारणं सोपं नसतंच कधीही.‘ब्र’ म्हणजे अवाक्षर.‘गप्प बस… नाहीतर…’ या धमकीला न भिताधाडसानं उच्चारलेला शब्द म्हणजे ब्र!स्वत:बाहेर पडणं, हा अशा भीतीवरचा उत्तम उपाय.मग एक साधारण गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती अशाएकीचा सुरू झालेला प्रवास.बाईच्या नजरेनं निरागसपणानं पाहिलेलं जग.एक प्रकारे आदिवासी भागातल्या अनुभवांचा अहवाल.त्यासोबत स्वयंसेवी संस्थांमधलं राजकारण आणिस्त्री-पुरुष संबंधांमधलं राजकारणदेखील!हे लेखन महानगर, शहर, खेडेगाव आणि आदिवासीवाड्यापाडे अशा सगळयांना सामावून घेतं.