दिलीप प्रभावळकर म्हणजे अभिनयनिपुणसव्यसाची कलावंत! हा कलावंत एकसिद्धहस्त लेखकही आहे, हे त्यांचं लेखनवाचल्यानंतर प्रकर्षानं जाणवतं.प्रभावळकरांचा विनोद हा गुदगुल्याकरणारा, गालातल्या गालात हसवत प्रसन्नकरणारा आहे. या विनोदाचं वैशिष्ट्य हेचकी, तो कुठलीही झूल अंगावर घेत नाहीकी, विदूषकी पोझ घेत नाही.स्वत: प्रभावळकरच एका मुलाखतीतम्हणाले होते की, ‘मी जेव्हा नाटकात कामकरतो, तेव्हा नेहमीच्या जगण्यातले मुखवटेकाढून बाजूला ठेवतो.’ त्यांच्या लेखनाबद्दलहीहेच म्हणता येईल. ते जेव्हा लिहितात, तेव्हामुखवटेरहित होऊन लिहितात. सामान्यमाणसाला थेट भिडण्याचं सामथ्र्य आणिप्रांजळपणा हे प्रभावळकरांच्या विनोदाचंबलस्थान आहे.