अनुज खरे हा निसर्गाचे वेड असलेल्या अवलियांपैकी एक. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये अनुजने भारतातील लहान मोठी, लोकप्रिय, अप्रचलित सर्व प्रकारची जंगले पालथी घातली आहेत. महाराष्ट्रातील ताडोबा, नागझिरा जंगलाचा तर तो वारकरी आहे. विद्यार्थी दशेपासून ते आता वन विभागातील कर्मचाऱ्यांचा निसर्ग पर्यटन विषयातील मार्गदर्शक, या प्रवासात अनुजने अनेक जंगले जवळून पाहिली. वेगवेगळ्या जंगलांमध्ये फिरताना, वन्यप्राण्यांचे जगणे समजून घेताना त्याने जे प्रत्यक्ष बघितले, ते विविधरंगी प्रसंग 'अरण्यनाद' या पुस्तकातून वाचायला मिळतात. पुस्तकाचा कथाकार अनुज असला, तरी तो नायक नाही. प्रत्येक कथेचे नायक लहानशा पक्ष्यापासून ते रुबाबदार वाघापर्यंत वेगवेगळे वन्यप्राणी आहेत. सहज सोप्या, बोलक्या शब्दांमधून अनुजने जंगलातील किस्से लिहिले आहेत. या कथा जेवढ्या रंजक, उत्सुकता वाढविणाऱ्या आहेत, तशा त्या जंगल समजून सांगणाऱ्याही आहेत. (Description Credit - Maharashtra Times)
Must Read book for all wildlife Lovers.....Author is into the wildlife tourism and Conservation since the days when safari vehicles were not avaiable & one is required to explore the jungle through trek!!!
He has narrated the experiences beautifully & one can imagine easily the situation & get feel of it!!!! n That's the beauty of Reading ...Isn't it???
Write should have done better i.e. there are repetitive words which can be avoided.....Hope it will be rectified in next part!!!!!