रहस्य सांकेतिक चिन्हांचे : ही एक काल्पनिक गूढ कथा आहे. सृष्टी सौंदर्याने नटलेल्या विक्रमगडमधील व्यंकटराव देसाई यांच्या पूर्वजांनी बांधलेल्या गावाबाहेरच्या पुरातन वाड्यात काही अघटीत घटना घडलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या आजोबांनी तो वाडा कायमचा सोडून दिलेला असतो. व्यंकटरावांच्या आजोबांनी त्यांना त्या वाड्याबद्दल एकाच वाक्यात सांगितलेले असते. ते असे की तो वाडा अशुभ आहे. त्यामुळे त्या वाड्यात अगदीच आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्याशिवाय विनाकारण जायचे नाही. व्यंकटरावांनी आजोबांचा शब्द आयुष्यभर पाळलेला असतो.व्यंकटरावांची नातवंडे दिवाळीच्या सुट्टीत विक्रमगडला येतात. गावातील त्यांच्या मित्रांच्या आग्रहास बळी पडून ते त्या गावाबाहेरील पुरातन वाड्