दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा इतिहास हे अनुवादित केलेलं पुस्तक जेंव्हा प्रकाशनासाठी माझ्या हाती आलं, तेंव्हा या पुस्तकाचे आणि माझे काही ऋणानुबंध आहेत असं वाटू लागलं. गांधी सर्वोदय मंडळाचे प्रमुख तुलसीदासजी सोमैय्या यांनी हे पुस्तक ब्रिजमोहनजी हेडा यांचेकडे अनुवादकरता सोपवले. हे समजल्यानंतर हे पुस्तक मला आणखीच जवळचं वाटू लागलं. माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये महात्मा गांधी आणि गांधी चळवळ जाणून घेण्याच्या निमित्ताने मुंबई सर्वोदय मंडळामध्ये, गांधीभवन पुणे येथे, आगाखान पॅलेस येथे आणि त्यांनतर राळेगण सिद्धी येथे मला तुलसीदास सोमैय्या यांच्यासोबत राहण्याचा योग आला आणि ही चळवळ समजून घेण्याचा मी थोडाफार प्रयत्न केला. ही चळवळ स्वतःचे न्याय्य हक्क शाबूत ठेवा