चाळीस पेक्षा अधिक विविध विषयांवरील नातेसंबंध, माणसं, परिसर, यांवर आधारित कथांचा कथासुगंध हा अतिशय वाचनीय कथासंग्रह आहे. डॉ विजया वाड यांच्या उत्कृष्ट व निवडक कथांचा या कथासंग्रहामध्ये समावेश केला आहे.
डॉ. विजया वाड या मराठी लेखिका व बालसाहित्यिका आहेत. त्यांनी कादंबरी, कथा, कविता, चरित्र, प्रवासवर्णन, ललित अशा विविध आकृतिबंधांत लेखन केले असून, ‘अभोगी’, ‘अक्षांश, रेखांश’, ‘त्रिदल’, 'पैठणी' इत्यादी कादंबर्या त्यांच्या नावावर आहेत.