पंचवीस- तीस वर्षं एक हाती (किंवा स्वतःच्या सासूशी झगडत) संसार केलेल्या सासूला स्वतः विषयी रास्त (?) अभिमान, मुलावरचा अधिकार सहजासहजी सोडणं शक्यच नसतं. बरेचदा आपण निवडलेल्या मुलीशीच मुलाचे लग्न व्हायला हवे हा हट्ट ही असतो. प्रस्तुत एकांकिकेत वत्सला सुद्धा टिपिकल सासूला अपवाद नाही. तिला तेजस्विनीच्या रुपात तिच्या लेखी ‘परफेक्ट’ सून मिळते. ती कशी आणि पुढे काय होते ते पहाच! या हलक्या फुलक्या नाटकात अलगद सोडवलेली संसाराची गाठ वेगळीच मजा देऊन जाईल हे नक्की.